प्रसिद्ध गायकाला पाठिंबा देण्यासाठी अभिजीत दिपके मैदानात; आधी टोमणे मारले, आता…
दिल्लीतील दिलजीतच्या कॉन्सर्टला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दिल्ली पोलिसांच्या भूमिकेने चर्चांना उधाण आलं आहे.

कॉक्रोच जनता पार्टीवर नाराजी व्यक्त करणारा गायक दिलजीत दोसांझ याला पाठिंबा देण्यासाठी अभिजीत दिपके मैदानात उतरला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलजीतच्या कॉन्सर्टला परवानगी नाकारल्याने दिपके पाठिंब्यासाठी पुढे आले आहेत.
दिपकेंनी कॉन्सर्टला परवानगी नाकारण्यावरून दिल्ली पोलिसांना टोमणा लगावला आहे. विशेष म्हणजे नीट पेपर फुटीदरम्यान दिलजीतने कॉक्रोच जनता पार्टीवर नाराजी व्यक्त केली होती.
अभिजीत दिपकेंनी म्हटलं की, आता कॉन्सर्टला देखील घाबरू लागले आहेत'. परंतु दिपकेंनी या पोस्टमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही.
दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणात्सव 30 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमला होणाऱ्या दिलजीतच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.
प्रसिद्ध गायक दिलजीतने त्याच्या ‘इंडिया ऑरा टूर’अंतर्गत देशातील सात शहरांत कॉन्सर्ट करण्याची घोषणा केली . आ कॉन्सर्टची सुरुवात दिल्लीपासून सुरू होणार होती.