ते रेकॉर्ड केलं असं ना तर… गौरव मोरेला भाषेवरून हिणवलं, इंडस्ट्रीतला वाईट अनुभव

Gaurav More: गौरव मोरेने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये करिअरच्या सुरुवातीच्या काळातील आठवण सांगितल्या आहेत. त्याला भाषेवरुन हिणवलं गेलं होतं असे तो म्हणाला आहे.

| Updated on: Oct 07, 2025 | 6:21 PM
1 / 5
आज गौरव मोरेला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून तो घराघरात पोहोचला. त्याने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान प्राप्त केले आहे. पण गौरवचा इथवरचा प्रवास हा सोपा नव्हता. गौरवने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत सांगितले आहे.

2 / 5
गौरव मोरे हा अतिशय गरीब कुटुंबातून आलेला, ताडपत्रीच्या घरात राहिलेला आहे. करिअरच्या सुरुवातीला त्याला भाषेवरुन प्रचंड त्रास देण्यात आला होता. याविषयी त्याने वक्तव्य केले आहे.

3 / 5
नुकताच गौरवने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने करिअरच्या सुरुवातीला त्याला इंडस्ट्रीमधील लोकांनी भाषेवरुन किती हिणवले याविषयी सांगितले आहे.

4 / 5
गौरव मोरे म्हणाला, 'खूप त्रास दिलाय मला लोकांनी. म्हणजे एवढा त्रास दिलाय की, मी सांगू शकत नाही. ते जर रेकॉर्ड केलं असतं तर मी तुम्हाला दाखवलं असतं की हिणवणं काय असतं, मला असं व्हायचं की, ठीक आहे ना! चुकतोय आपण थोडासा वेळ लागेल, मी वीस-बावीस वर्ष त्याच वातावरणात वाढलोय, मला माहितच नाही ना, काय आणि कसं असतं. त्यामुळे थोडा वेळ जाईल.'

5 / 5
 गौरव मोरे पुढे म्हणाला, 'आता मी मुद्दाम तसंच बोलतो. त्याचा त्रास झाला, पण मी त्याचा त्रास करून नाही घेतला. आता आपली वेळ थोडी चांगली नाहीये. बदलण्यासाठी थोडं शांत राहूया आणि कामातून उत्तरं देऊया. शेवटी प्रेक्षक मोठं करतात आणि आता त्यांचं प्रेम आहे.'