Gaurav More: फिल्टर पाड्यात ताडपत्रीचे घर ते फ्लॅट! गौरव मोरेचे स्वप्न सत्यात उतरलं, भावनिक पोस्ट व्हायरल

Gaurav More new house: सध्या सोशल मीडियावर सर्वांचा लाडका फिल्टर पाड्याचा बच्चन उर्फ गौरव मोरे चर्चेत आहे. गौरवने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्वप्न सत्यात उतरल्याचं म्हटलं आहे. अनेक कलाकारांनी त्यावर कमेंट्स करत त्याचे अभिनंदन केले आहे.

| Updated on: Sep 26, 2025 | 12:10 PM
1 / 6
महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी मालिकेतून महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करणारा मराठमोळा कलाकार म्हणजे गौरव मोरे. आज गौरव मोरेला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. आता गौरवचे एक मोठे स्वप्न पूर्ण झाल्याचे दिसत आहे.

2 / 6
गौरव हा अत्यंत साध्या कुटुंबातून आला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रत्येकाचे स्वप्न असते का स्वत:च्या हक्काचे सुंदर असे घर असावे. आता गौरव मोरेचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

3 / 6
गौरव मोरेने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या घराचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने स्वप्न सत्यात उतरल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर गौरवची ही पोस्ट चर्चेत आहे.

4 / 6
गौरवने फोटो शेअर करत, (ताडपत्री ते फ्लॅट) फ़िल्टर पाडा ते पवई हा प्रवास बघताना खूप छोटा वाटतो, पण तो पूर्ण करण्यासाठी खूप वर्ष लागली आहे. जिथे राहतो तिथेच आपल घर असाव हे कायम मनात होत. लहानपणापासून वाटत होत जिथे राहतो तिथेच घर घ्यायचं आणि आज ते स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरलं आहे.

5 / 6
काल दिनांक२५-९-२०२५ रोजी आम्हाला आमच्या पवईच्या नवीन घराचा ताबा मिळाला. ताडपत्री ते फ्लॅट असा हा प्रवास आहे. आणि काल घरच्यांना त्या घराचा आनंद घेताना बघुन मन भरून आल आणि वाटल आपण आपल्या परिवारासाठी काहीतरी केल. माझी नाळ कायम फ़िल्टर पाडा आणि पवई सोबत जोडली गेली आहे आणि ती कधीच तुटणार नाही. माझ हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी आभार मानतो असे पुढे त्याने म्हटले आहे.

6 / 6
गौरवच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच श्रेया बुगडे, तेजश्री प्रधान, अभिजीत सावंत, पार्थ भालेराव आणि इतर काही कलाकारांनी कमेंट्स करत गौरवचे अभिनंदन केले आहे.