शाहरुख-सलमानपेक्षाही मोठं स्टारडम, एका करारामुळे करिअर उद्ध्वस्त; कुठे आहे तो सुपरस्टार?

90 च्या दशकात जिथे एकीकडे सलमान खान आणि शाहरुख खान यांसारखे कलाकार सुपरस्टार बनण्याच्या शर्यतीत होते. तिथे दुसरीकडे अभिनेता पृथ्वी वजीर यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपलं स्टारडम आधीच प्रस्थापित केलं होतं. दमदार अभिनय आणि देखण्या रूपात पृथ्वी खऱ्या आयुष्यातही हिरोच वाटायचे.

| Updated on: Apr 16, 2026 | 7:45 PM
1 / 5
आपल्या काळातील अत्यंत नावाजलेले अभिनेते असूनही पृथ्वी वजीर आज विस्मृतीत हरवले आहेत. 90 च्या दशकात चित्रपटसृष्टीत मोठ्या सुपरस्टारचा उदय झाला. सलमान, शाहरुख, अजय देवगण, आमिर खान आणि अक्षय कुमार यांसारखे अभिनेते या सुपरस्टार्सपैकी एक आहेत. पृथ्वी वजीरसुद्धा त्यापैकीच एक होते. दमदार अभिनय कौशल्याने आणि देखण्या रूपाने त्यांनी इतर अभिनेत्यांना मागे टाकलं होतं.

2 / 5

1992 साली प्रदर्शित झालेल्या 'दिल का क्या कसूर' या चित्रपटातून त्यांनी आपल्या दमदार अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. पृथ्वी वजीर यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अभिनेत्री दिव्या भारतीची मुख्य भूमिका असलेल्या या सुपरहिट चित्रपटातून त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली होती.

3 / 5

'दिलवाले कभी ना हारे', 'प्लॅटफॉर्म', 'गुलाम', 'दरार', 'होगी प्यार की जीत', 'माँ तुझे सलाम' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. 2024 मध्ये त्यांनी 'धाकड' या चित्रपटातून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय छोट्यामोठ्या कार्यक्रमांमध्ये ते पाहुणे म्हणून दिसून आले.

4 / 5

पृथ्वी वजीर यांचं करिअर उद्ध्वस्त होण्यामागचं कारण एक कॉन्ट्रॅक्ट होतं. या कॉन्टॅक्टमधील अटीनुसार दुसऱ्या कोणत्याही चित्रपटात ते काम करू शकत नव्हते. 2021 मध्ये 'झकास बॉलिवूड'ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबद्दलचा खुलासा केला होता.

5 / 5

या करारामुळे त्यांना शाहरुख खानच्या 'दिवाना' आणि 'डर' यांसारख्या चित्रपटांना गमवावं लागलं होतं. कामाच्या अभावामुळे अखेर त्यांना बी ग्रेड चित्रपटांच्या ऑफर्स स्वीकाराव्या लागल्या होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us