5.47 लाख रुपयांमध्ये 7 सीटर कार, मायलेज आणि फीचर्सही जबरदस्त, घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी
जर तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये प्रशस्त आणि जास्त मायलेज देणारी कार शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

भारतात सध्या मोठ्या कुटुंबासाठी जास्त मायलेज आणि कमी किंमत असणाऱ्या कारसाठी ग्राहकांची प्रचंड पसंती आहे. अशातच आज आम्ही तुम्हाला भारतातील 7 सीटर कारबाबत सांगणार आहोत, ज्यांची किंमत 8 लाखांच्या आत आहे. फीचर्स देखील खूपच जबरदस्त आहेत.

सध्या मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, निसान मोटर इंडिया आणि रेनो इंडिया या कंपन्यांनी 7-सीटर किंवा मल्टी-पर्पज वाहनांचे (MPV) पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

याशिवाय रेनो ट्रायबर ही 7-सीटर एमपीवी असून तिची सुरुवातीची किंमत सुमारे 5.76 लाख रुपये आहे. ही कार सुमारे 20 किमी प्रति लिटर मायलेज देते. त्यामुळे जर तुम्ही कमी बजेटमध्ये मोठ्या कुटुंबासाठी प्रशस्त आणि उपयोगी वाहन घेण्याचा विचार करत असाल, तर हे पर्याय नक्कीच योग्य ठरू शकतात.

तसेच महिंद्रा बोलेरो ही एक मजबूत आणि विश्वासार्ह 7-सीटर एसयूव्ही आहे. तिची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये आहे. या एसयूव्हीचे मायलेज अंदाजे 16 किमी प्रति लिटर आहे.

मारुती सुझुकी ईको ही एक लोकप्रिय कार आहे. ती प्रवासी वाहन किंवा मालवाहू वाहन म्हणून वापरता येते. या 6-सीटर व्हॅनची एक्स-शोरूम किंमत सुमारे 5.47 लाख रुपये असून ती सुमारे 19.71 किमी प्रति लिटर मायलेज देते.

यामध्ये निसान ग्रेवाइट ही देशातील सर्वात स्वस्त एमपीवी मानली जाते. तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 5.65 लाख रुपये आहे. ही कार सुमारे 19.6 किमी प्रति लिटर मायलेज देते.