आफताब शिवदासानीची पत्नी दिसते इतकी सुंदर; समोर बॉलिवूडच्या हिरोइनसुद्धा फेल

मस्ती, ग्रँड मस्ती, आवारा पागल दिवाना, क्या कूल है हम 3 यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता आफताब शिवदासानीची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. त्याच्या पत्नीच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत.

| Updated on: Aug 18, 2025 | 1:07 PM
1 / 6
अभिनेता आफताब शिवदासानीची पत्नी निन दुसांज अत्यंत सुंदर आणि प्रभावशाली महिला आहे. तिचा जन्म लंडनमध्ये झाला असून ती मूळ पंजाबी आहे. निनचं शिक्षण लंडनमध्येच पूर्ण झालं. त्यानंतर ती हाँगकाँगला गेली.

2 / 6
हाँगकाँगमध्ये निनने फॅशन आणि जाहिरात क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. निनने अनेक लग्जरी ब्रँड्सच्या जाहिरातींसाठी काम केलंय. आकर्षक व्यक्तिमत्त्व हे तिचं वैशिष्ट्य आहे.

3 / 6
आफताब आणि निन यांची भेट मुंबईतील एका पुस्तक लाँच कार्यक्रमादरम्यान झाली होती. या कार्यक्रमात आफताब पाहुणा म्हणून पोहोचला होता. निनला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता.

4 / 6
निन आणि आफताब एकमेकांना डेट करू लागले आणि डेटिंगच्या तीन आठवड्यांतच त्याने निनला लग्नासाठी प्रपोज केलं. 2012 मध्ये या दोघांनी साखरपुडा केला आणि त्याच्या दोन वर्षांनंतर 2014 मध्ये आफताब आणि निनने लग्नगाठ बांधली.

5 / 6
2017 मध्ये कुटुंबीय आणि मित्रपरिवारासाठी आफताब आणि निन यांनी श्रीलंकेत हिंदू विवाहपद्धतीनुसार पुन्हा लग्न केलं. या लग्नाची तेव्हा चांगलीच चर्चा झाली होती.

6 / 6
निन ही फक्त मॉडेलच नाही तर ती एक निर्मातीसुद्धा आहे. आफताबसोबत मिळून तिने 'धुंध' या चित्रपटाची निर्मिती करत आहे. 2020 मध्ये तिने निनने मुलीला जन्म दिला. निन तिच्या सोशल मीडियावर अनेकदा मुलीसोबतचे फोटो शेअर करते.