
न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज फिन ऐलन टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये धमाकेदार खेळतोय. सेमीफायनल सामन्यात अवघ्या 33 चेंडूत शतक ठोकून त्याने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. या दरम्यान त्याने एक नवीन वर्ल्ड रेकॉर्डही बनवला. (PHOTO CREDIT- PTI)

सेमीफायनल सामन्यात अवघ्या 12.5 ओव्हर्समध्ये न्यूझीलंड टीमने 170 धावांचं टार्गेट चेज केलं. या दरम्यान फिन ऐलनने 10 चौकार आणि 8 षटकारांसह टी 20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील वेगवान शतक झळकावलं. 8 सिक्ससह त्याने एका खास कामगिरीची नोंद केली. (PHOTO CREDIT- PTI)

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये फिन ऐलनने आतापर्यंत 20 सिक्स मारले आहेत. टी20 वर्ल्ड कपच्या एका एडिशनमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा फलंदाज तो बनलाय. त्याने वेस्टइंडीजच्या शिमरोन हेटमायरचा रेकॉर्ड तोडला. त्याने सुद्धा या एडिशनमध्ये 19 सिक्स मारले आहेत. साहिबजादा फरहान 18 सिक्ससह तिसऱ्या नंबरवर आहे. (PHOTO CREDIT- PTI)

टी20 वर्ल्ड कपच्या या एडिशनमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक सिक्स मारण्यामध्ये फिन ऐलन संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहे. या लिस्टमध्ये ख्रिस गेल ११ सिक्ससह सर्वात पुढे आहे. एरॉन जोन्सने मागच्या एडिशनमध्ये एका सामन्यात 10 सिक्स मारले होते. (PHOTO CREDIT- PTI)

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सर्वात जास्त धावा करण्यामध्ये फिन ऐलन आता तिसऱ्या नंबरवर आहे. त्याने या एडिशनच्या 7 डावात 57.80 च्या सरासरीने 289 धावा केल्या आहेत. या लिस्टमध्ये पाकिस्तानचा साहिबजादा फरहान 383 धावांसह सर्वात पुढे आहे. फिन ऐलनची अजून एक इनिंग बाकी आहे. फायनलमध्ये जेव्हा तो फलंदाजी करेल. (PHOTO CREDIT- PTI)