Health Tips : प्रदूषणाचा होतोय त्रास, सकाळी उठताच घस खवखवतो, सर्दीसारखं वाटतं, ‘हे’5 उपाय नक्की करून पहा
Health Tips : सध्याचं वातावरण पाहता हवेळी प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. अनेकांना ताप, सर्दी, खोकल्याच्या समस्या जाणवत आहेत. तर अनेकांचा सकाळी उठल्या-उठल्या घसा खवखवत आहे... अशात बदलत्या ऋतूंमध्ये आपला घसा आणि नाक निरोगी ठेवण्यासाठी आतापासूनच काही खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.

जसजशी थंडी वाढते, तसतसे हवेतील प्रदूषणाचे प्रमाणही वाढू शकते. यामुळे, बऱ्याच लोकांना सकाळी हलका घसा खवखवतो आणि झोपेतून उठल्यावर सर्दीसारखी लक्षणे जाणवतात. हवेतील प्रदूषणाचे अतिसूक्ष्म कण श्वासोच्छ्वासाद्वारे फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकतात. काही कण आणि प्रदूषकांमुळे शरीरातील इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.
घशातील आणि नाकातील प्रदूषणापासून आराम मिळवण्यासाठी अनेक उपाय आहेत. त्यापैकी एक म्हणजे सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे. हे प्यायल्याने घशाच्या त्रासापासून आराम मिळू शकतो. मधासोबत कोमट पाणी प्यायल्याने खोकला कमी होण्यासही मदत होते.
जेव्हा वायू प्रदूषणाची पातळी जास्त असते, तेव्हा तुम्ही तुमच्या बाहेरील हालचाली मर्यादित ठेवाव्यात. जर तुम्हाला बाहेर जावेच लागले, तर मास्क घाला. मास्कमुळे सूक्ष्म कणांच्या संपर्कात येण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
प्रदूषण जास्त असताना खिडक्या आणि दारे बंद ठेवा. शक्य असल्यास, पुरेशा क्षमतेचा एअर प्युरिफायर वापरा. घसा खवखवणे आणि खोकला बराच काळ टिकून राहिल्यास, श्वास घेण्यास त्रास झाल्यास, छातीत दुखल्यास किंवा लक्षणे अधिक गंभीर झाल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या.
एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ घालून गुळण्या केल्याने घशाच्या त्रासापासून आराम मिळू शकतो. दुधात हळद उकळून ते दूध प्यायल्याने आरोग्य राखण्यास मदत होते. कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. (फोटो सौजन्य - tv9 हिंदी)