अक्षय्य तृतीया की अक्षय तृतीया? 99 टक्के लोक लिहिताना करतात चूक, कोणता शब्द योग्य?

अक्षय्य तृतीया की अक्षय तृतीया? या सणाचा नेमका अर्थ आणि व्याकरणानुसार योग्य शब्द कोणता? या दिवशी सोने खरेदी आणि दानाचे महत्त्व काय आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आणि शास्त्र जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

| Updated on: Apr 19, 2026 | 12:55 PM
1 / 8
हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व असते. या दिवशी सोने खरेदी, नवीन वस्तूंची सुरुवात किंवा दानधर्म करण्याकडे कल असतो. पण या सणाचा उल्लेख नक्की कसा करावा, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व असते. या दिवशी सोने खरेदी, नवीन वस्तूंची सुरुवात किंवा दानधर्म करण्याकडे कल असतो. पण या सणाचा उल्लेख नक्की कसा करावा, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

2 / 8

आजही अनेकजण अक्षय्य तृतीया की अक्षय तृतीया यात गडबड करतात. व्याकरण आणि शास्त्रानुसार यातला नेमका योग्य शब्द कोणता आणि त्याचा अर्थ काय, हे बहुतेकांना माहित नसते. आज आपण त्याबद्दल जाणून घेऊया.

3 / 8

मराठी आणि संस्कृत व्याकरणानुसार, अक्षय्य (Akshaya) हा शब्द अधिक अचूक मानला जातो. क्षय म्हणजे नाश किंवा घट होणे आणि अक्षय्य म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही किंवा ज्याची हानी होत नाही. या दिवशी केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ हे अक्षय्य असते, म्हणजेच ते कधीही न संपणारे असते. त्यामुळेच या तिथीला अक्षय्य तृतीया असे संबोधले जाते.

4 / 8

या दिवशी केलेले दान, जप, तप आणि सत्कर्म यांचा कधीही नाश होत नाही, उलट ते अनंत पटीने परत मिळते, अशी धार्मिक धारणा आहे. वैशाख शुद्ध तृतीयेला ही तिथी येते. पुराणांनुसार, याच दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता. तसेच भगवान परशुरामांचा जन्म आणि गंगेचे पृथ्वीवर अवतरण देखील याच दिवशी झाले होते.

5 / 8

अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त इतका शुभ मानला जातो की, या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची किंवा विशेष मुहूर्त काढण्याची गरज नसते. आजच्या काळात या दिवशी सोने खरेदी करण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते.

6 / 8

सोने हे शाश्वत संपत्तीचे प्रतीक मानले जाते. मात्र, शास्त्रात या दिवशी दानाचे महत्त्व अधिक सांगितले आहे. प्रामुख्याने मातीचे माठ, पाणी, छत्री, पंखा आणि अन्नाचे दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते, असा समज आहे.

7 / 8

जर तुम्हीही या सणाला केवळ अक्षय म्हणत असाल, तर यामागील सात्विक अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. केवळ नावापुरता हा सण नसून, आपल्या आयुष्यातील चांगल्या गुणांचा आणि पुण्याचा कधीही क्षय होऊ नये, हाच यामागचा खरा संदेश आहे.

8 / 8

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us