Alia Bhatt Sister : शाहीन भट्टची खासगी आयुष्याबद्दल मोठी घोषणा, आलिया भट्टचे होणारे भाऊजी कोण? काय करतात?

Alia Bhatt Sister : आलिया भट्टची बहिण शाहीन भट्टने आपल्या पर्सनल लाइफबद्दल मोठी घोषणा केली आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन तिने गुड न्यूज दिली आहे.

| Updated on: Apr 17, 2026 | 3:24 PM
1 / 5
बॉलीवुड स्टार आलिया भट्टची बहिण शाहीन भट्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.  याचं कारण तिची पर्सनल लाइफ आहे. शाहीनने लॉन्ग टर्म बॉयफ्रेंड सोबत साखरपुडा केला आहे. त्याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेत.

बॉलीवुड स्टार आलिया भट्टची बहिण शाहीन भट्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. याचं कारण तिची पर्सनल लाइफ आहे. शाहीनने लॉन्ग टर्म बॉयफ्रेंड सोबत साखरपुडा केला आहे. त्याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेत.

2 / 5

शाहीनने काही काळापूर्वीच आपली रिलेशनशिप जाहीर केली होती. तेव्हापासून ती बॉयफ्रेंड ईशान मेहरासोबत सतत फोटो शेअर करतेय. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळतय.

3 / 5

अलीकडेच शाहीनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ईशानसोबत फोटो शेअर करुन मेसेज लिहिला होता. आम्ही परस्परांना पसंत करण्याच्या बाबतीत जरा जास्तच केलं. या फोटोंमध्ये शाहीनने साखरपुड्याची अंगठी घातल्याचं दिसत आहे.

4 / 5

पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये चित्रपट सृष्टीतील अनेक जण तिला शुभेच्छा देत आहेत. यात नव्या नवेली नंदा सुद्धा आहे. शाहीन तुला भरपूर शुभेच्छा असं नव्याने लिहिलय. अनन्या पांडेने सुद्धा लिहिलय, मी तुझ्यासाठी भरपूर खुश आहे.

5 / 5

शाहीन भट्टचा होणारा नवरा ईशान मेहरा स्पोर्ट्स आणि फिटनेस कोच आहे. सोशल मीडियावर ईशान खूप एक्टिव आहे. अकाऊंट बद्दल बोलायचं झाल्यास तो जीमशी रिलेटेड पोस्ट जास्त शेअर करत असतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us