Ambani Antilia : अंबानींच्या घरात कशी साजली झाली जन्माष्टमी! फोटो पाहून व्हाल अवाक्

Ambani Antilia : अंबानी कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आपल्या रॉयल आणि क्लासी लाईफ स्टाईलमुळे चर्चेत असणाऱ्या अंबानी कुटुंबियांबद्दल खास गोष्टी जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. आता त्यांनी साजरी केलेल्या जन्माष्टमीचे फोटो व्हायरल होत आहे.

| Updated on: Sep 06, 2026 | 5:00 PM
1 / 5
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथे जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पुरातन वस्तूंची आकर्षक सजावट, फुलांनी सजवलेली कृष्णाची प्रतिमा, कोरीव चांदीचा झोपाळा आणि पारंपरिक सजावट करण्यात आलेली.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथे जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पुरातन वस्तूंची आकर्षक सजावट, फुलांनी सजवलेली कृष्णाची प्रतिमा, कोरीव चांदीचा झोपाळा आणि पारंपरिक सजावट करण्यात आलेली.

2 / 5

नीता अंबानी यांनी जन्माष्टमीच्या विशेष प्रसंगासाठी पारंपरिक गुजराती लूक केला. ॲक्वा-ब्लू रंगाची बांधणी साडी, नाजूक जरदोजी काम, गुलाबी फुलांचा गार्टर बेल्ट आणि आकर्षक हिऱ्यांच्या दागिन्यांमुळे त्यांचा हा लूक अप्रतिम दिसत होता.

3 / 5

जन्माष्टमीच्या निमित्ताने अँटिलियाला नव्या नवरी प्रमाणे सजवण्यात आलेलं. बाळगोपाल यांच्यासाठी एक सुंदर भरतकाम केलेला चांदीचा झोपाळा सजवण्यात आला होता. या झोपाळ्यात बाळकृष्णाची एक सुंदर मूर्ती ठेवण्यात आली होती.

4 / 5

झोपाळ्याच्या मागे कमळावर बसलेल्या कृष्णाचे एक सुंदर मोझॅक चित्र साकारण्यात आलं होतं. वेगवेगळ्या रंगांच्या लहान तुकड्यांनी बनवलेल्या या कलाकृतीने पूजास्थळाच्या सौंदर्यात आणखी भर घातली.

5 / 5

फोटोंमध्ये नीता अंबानींची भगवान कृष्णाप्रती असलेली श्रद्धा आणि भक्ती त्यांच्या या संपूर्ण लूकमध्ये स्पष्टपणे दिसून येत होती. पारंपरिक गुजराती पोशाख, आकर्षक दागिने आणि भक्तिपूर्ण वातावरणात अँटिलिया येथील जन्माष्टमीचा सोहळा अधिकच विशेष झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us