तुमच्या घरात बनतो त्यापेक्षाही अंबानी कुटुंबाचा दररोजचा नाश्ता साधा आणि हेल्दी, दहा मिनिटातच..
Ambani Family Diet : अंबानी कुटुंब कायमच चर्चेत असते. अंबानींच्या लाईफस्टाईलबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळते. त्यातच अंबानी नक्की काय खातात काय पितात याबाबत लोकांना जाणून घ्यायची इच्छा असते.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी यांच्या नावाचा समावेश होतो. त्यांची लाईफस्टाईल हा देखील चर्चेचा विषय ठरतो. अंबानी काय खातात काय पितात याकडे सर्वांच्या नजरा असतात.
प्रत्येकाला अंबानीबद्दल जाणून घ्यायचे असते. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्याबद्दल लोकांना मोठी क्रेझ आहेच. 27 मजली अँटिलिया सारख्या महालात अंबानी कुटुंब राहते.
हेलिपॅड्स त्यांच्या घरावर आहे. 600 कर्मचारी 24 तास काम करतात. अंबानी नाश्त्यात काय खातात हे जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
नाश्त्यात मुकेश अंबानी आणि सर्व अंबानी कुटुंबाला साऊथ इंडियन पदार्थ जास्त आवडतात. त्यांच्या नाश्त्यात साऊथ इंडिय पदार्थ अधिक असतात. यासोबतच त्यांच्या नाश्त्यात ज्यूस आणि काही फळेही असतात. 10 मिनिटात होणारा उपमा त्यांच्या नाश्त्यात असतो.
इंडियन पदार्थच त्यांच्या नाश्त्यात असतात. ब्रेड वगैरे अशा गोष्टी नाश्त्यामध्ये त्यांच्याकडून टाळल्या जातात. कधी कधी पराठेही अंबानी कुटुंबियांच्या नाश्त्यात असतात.