
अमीषाने विनंती केली की, त्यांच्यासोबत प्लीज पॉडकास्ट करा. जेणेकरुन मला त्याच्याबाबत अजून समजेल. मला लहानपणापासून त्याच्यावर क्रश आहे.

ती बोलली माझा पेन्सिल बॉक्स, फाइल्स, स्टेशनरी सर्वांवर त्यांचा फोटो होता. माझ्या रुममध्ये सुद्धा त्यांचाच फोटो लागलेला. मी त्याच्यासाठी माझी तत्व बाजूला ठेऊन काहीही करु शकते.

अमीषा पटेल हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूजवर टोटल फिदा आहे. या बद्दल ती आतापर्यंत अनेकदा बोलली आहे. पण यावेळी ती आपल्या क्रशबद्दल एक मोठी गोष्ट बोललीय.

अमीषाने रणवीर इलाहबादियाशी बोलताना सांगितलं की, मी माझी तत्व बाजूला ठेऊन त्याच्यासोबत रात्र घालवायलाही तयार आहे.

अमीषा दीर्घ श्वास घेत म्हणाली की, तुम्ही विचाराल की टॉम क्रूजसोबत रात्र घालवायला तयार आहेस का? तर, हो मी त्याच्यासोबत वननाइट स्टँडसाठी तयार आहे.