Photo : ‘समाधीचे दर्शन घेऊन अभिमानाने ऊर भरून आला’ अमोल कोल्हेंची होदीगेरीमधील शहाजीराजेंच्या समाधीस्थळाला भेट

| Updated on: Feb 18, 2022 | 10:13 PM

शिवसेनेचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी कर्नाटकमधील होदीगेरीमध्ये जाऊन स्वराज्य संकल्पक शहाजीराजेंच्या (Shahaji Raje) समाधीचे दर्शन घेतले. यावेळी काढलेले काही फोटो त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. समाधीचे दर्शन घेऊन अभिमानाने ऊर भरून आल्याचे त्यांनी म्हटले. मात्र दुसरीकडे समाधी स्थळाची दुरवस्था बघून मन विषण्ण झाल्यची खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

1 / 4
शिवसेनेचे खासदार अमोल कोल्हे यांनी कर्नाटकमधील होदीगेरीमध्ये जाऊन स्वराज्य संकल्पक शहाजीराजेंच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी काढलेले काही फोटो त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. समाधीचे दर्शन घेऊन अभिमानाने ऊर भरून आल्याचे त्यांनी म्हटले.

2 / 4
अमोल कोल्हे यांनी शहाजीराजेंच्या समाधीचे दर्शन घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र त्यांनी यावेळी शहाजीराजेंच्या समाधीची झालेली दुरवस्था बघून खंत देखील व्यक्त केली आहे.

3 / 4
मी आज शहाजीराजेंच्या समाधीचे कर्नाटकमधील होदीगेरीमध्ये जाऊन दर्शन घेतले. समाधीस्थळाची दुरवस्था बघून मन विषण्ण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून या समाधीस्थळाच्या विकासासाठी पाठपुरावा करणार असल्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

4 / 4
दरम्यान अमोल कोल्हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तात्काळ या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना पत्र देखील लिहिले आहे. या ठिकाणी  शहाजीराजेंच्या स्मारकाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रातून केली आहे.