Tea Business : लोकांना चहा पाजून-पाजून कोट्याधीश बनलेले चहावाले, कमाईचा आकडा वाचून विस्फारतील डोळे

Tea Business : भारतात चहा फक्त एक पेय नाहीय. लोकांच्या आयुष्याचा एक भाग आहे. सकाळ असो वा संध्याकाळ चहाच्या सुंगधाने मनाला ताजेपणा येतो. या चहाच्या बिझनेसमधून आज काहीजण कोट्याधीश बनले आहेत.

| Updated on: Oct 01, 2025 | 4:21 PM
1 / 5
प्रफुल्ल बिल्लौरेने MBA Chai Wala ब्रांडची सुरुवात एका छोट्याशा स्टॉलपासून केली होती. आता त्याचे 100 पेक्षा जास्त आऊटलेट आहेत. वर्षाची कमाई 10 ते 40 कोटी दरम्यान आहे. प्रफुल्लच्या स्टोरीवरुन हे स्पष्ट होतं की, स्वस्त आणि स्वादिष्ट चहा त्यात सोशल मीडियाचा योग्य वापर करुन तुम्ही मोठे होऊ शकता.

2 / 5
अनुभव दुबे यांनी भारताच्या 195 शहरात 400 पेक्षा जास्त आउटलेट ओपन केलेत. इतकच नाही, दुबई, यूके, कॅनडा आणि ओमान सारख्या देशांपर्यंत त्यांचा चहाचा बिझनेस पोहोचला आहे. त्यांची कंपनी दरवर्षी 100 ते 150 कोटीची चहा विकते.

3 / 5
नितिन सलूजा यांच्या Chaayos ने चहा पिण्याची पद्धतच बदलून टाकलीय. इथे ग्राहक आपल्या मर्जीने चहाची टेस्ट बदलू शकतात. देशात त्यांचे 200 पेक्षा जास्त आऊटलेट आहेत. वार्षिक कमाई 70 ते 150 कोटी दरम्यान आहे.

4 / 5
नागपूरच्या  Dolly ची आपली स्टाइल आणि मज़ेदार डायलॉग्सने सोशल मीडियावर धूम आहे. त्याची महिन्याची कमाई 3 ते 5 लाखा दरम्यान आहे.  Dolly ने दाखवून दिलं की, चहाचा बिझनेस फक्त एका स्टॉलपुरता मर्यादीत नाही. डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन सुद्धा मोठं करिअर बनवता येऊ शकतं.

5 / 5
अमुलीक सिंह बिजराल यांच्या Chai Point चे देशभरात 170 पेक्षा जास्त आऊटलेट आहेत. त्यांनी 200 कोटीच्या वर बिझनेस केला आहे. क्विक सर्विस आणि प्रत्येक ठिकाणी एकसारखी टेस्ट ही त्यांची खासियत आहे.  शहरी लोकांसाठी हा ब्रांड एकदम परफेक्ट ऑप्शन आहे.