Kavya Maran Wedding :रजनीकांत यांची भावी सून SRH ची मालकीण काव्या मारन आणि होणारा नवरा यांच्या वयात किती अंतर?
Kavya Maran Wedding : काव्या मारनच्या होणाऱ्या नवऱ्याचं रजनीकांत यांच्यासोबत नातं आहे. रजनीकांत यांची पत्नी लता या अनिरुद्धच्या मावशी आहेत. त्याने कमल हासन,ज्युनियर एनटीआर, थलपती विजय आणि अगदी शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटापर्यंत अनेक सुपरहिट गाण्यांना संगीत दिलं आहे.

येत्या नोव्हेंबर महिन्यात सनरायजर्स हैदराबादची CEO काव्या मारन विवाहबद्ध होणार आहे. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अनिरुद्ध रविचंदर सोबत तिचं लग्न होणार आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंता रेड्डी यांच्या सोशल मिडिया पोस्टमुळे काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांचा विवाह चर्चेत आला आहे. येत्या 21 नोव्हेंबरला चेन्नईमध्ये त्याच्या विवाहाचा स्वागतसोहळा आयोजित करण्यात आला आहे.
काव्या मारनच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी सन ग्रुपचे चेअरमन कलानिथी मारन आणि कावेरी मारन यांनी रेवंता रेड्डी यांची त्यांच्या ज्युबली हिल्स निवासस्थानी भेट घेतली. तो फोटो तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंता रेड्डी यांनी त्यांच्या अधिकृत एक्सवर पोस्ट केला आहे.
काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांनी त्यांचं पर्सनल आयुष्य खासगीच ठेवलं आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून त्यांची रिलेशनशिप आणि लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. 16 ऑक्टोंबर 1990 रोजी अनिरुद्ध रविचंदरचा तामिळनाडू चेन्नई येथे जन्म झाला. तो 36 वर्षांचा आहे.
काव्या मारनचा जन्म 6 ऑगस्ट 1992 रोजी झाला. तिचाही जन्म तामिळनाडू चेन्नईत झाला. सध्या ती 34 वर्षांची आहे. अनिरुद्ध आणि काव्याच्या वयात दोन वर्षांचं अंतर आहे. दोघांच्या बर्थ डेट बघितल्या तर अनिरुद्ध काव्यापेक्षा 1 वर्ष 10 महिन्यांनी मोठा आहे.
अनेक वर्षांपासून काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांच्या रिलेशनशिपची चर्चा होती. लास वेगास येथे दोघे एकत्र डिनरला गेले, तेव्हापासून या चर्चेने जास्त जोर पकडला. अनिरुद्ध किंवा काव्या दोघांनी जाहीरपणे कधीच प्रेमाची कबुली दिली नाही.