‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अभिनेत्रीचा साखरपुडा; कोण आहे होणारा नवरा?

अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी नाईकचा नुकताच साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवानीचा होणार नवरा आहे तरी कोण, ते जाणून घेऊयात..

| Updated on: Oct 27, 2025 | 10:14 AM
1 / 5
झी मराठी वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अप्पीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी नाईकने नुकताच साखरपुडा केला आहे. या साखरपुड्याचे खास फोटो समोर आले आहेत.

झी मराठी वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अप्पीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी नाईकने नुकताच साखरपुडा केला आहे. या साखरपुड्याचे खास फोटो समोर आले आहेत.

2 / 5

26 ऑक्टोबर रोजी शिवानीचा साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झाला. शिवानीने ज्याच्याशी साखरपुडा केला, तोसुद्धा मराठी मालिकांमधील अभिनेता आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' यात त्याने मकरंदची भूमिका साकारली आहे.

3 / 5

शिवानीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अमित रेखी असं आहे. गेल्या काही काळापासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. अखेर रविवारी त्यांचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याला अभिनेत्री निवेदिता सराफ यांची खास उपस्थिती होती.

4 / 5

अमित रेखीने 'भाग्य दिले तू मला', 'पिंगा गं पोरी पिंगा', 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. शिवानी आणि अमित यांनी काही नाटकांमध्ये एकत्र काम केलंय. तिथूनच त्यांच्याच चांगली मैत्री झाली.

5 / 5

अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील मुख्य भूमिकेसाठी जेव्हा शिवानी नाईकची निवड झाली होती, तेव्हा अमितने तिच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली होती. या दोघांवर सध्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us