14 वर्षांनी मोठ्या असलेल्या घटस्फोटित हिरोसोबत लिपलॉक, लग्न न करताच ही हसीना दोन मुलांची आई
तो घटस्फोटीत आहे. त्याचं पहिलं लग्न 1998 साली मेहर जेसियासोबत झालेलं. पण लग्नाच्या 21 वर्षानंतर घटस्फोट घेऊन दोघे वेगळे झाले. या लग्नापासून त्याला दोन मुली आहेत.

अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने अलीकडेच आपला बर्थ डे सेलिब्रेट केला. सेलिब्रेशनचे फोटो तिने आता इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये गॅब्रिएला बॉयफ्रेंड अर्जुन रामपालसोबत रोमँटिक होताना दिसली.

अर्जुन आणि गॅब्रिएलाने पस्परांना लिपलॉक केलं. अर्जुन आणि गॅब्रिएला परस्परांच्या प्रेमात बुडालेले दिसले. दोघांच्या नजरा परस्परांवर खिळल्या होत्या. नजरच ते एकमेकांवरुन हटवत नव्हते. बर्थडे पार्टीत गॅब्रिएलाने स्ट्रॉबेरी केक कापला.

ग्रॅबिएलाने बर्थ डे पार्टीमध्ये आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत खूप धमाल मस्ती केली. ती आनंदात दिसली. ग्रॅबिएलाने प्रिंटेड लॉन्ग ड्रेसमध्ये आपले काही फोटो शेअर केलेत. गार्डनमध्ये ती किलर पोज देताना दिसते.

ग्रॅबिएलाबद्दल बोलायचं झाल्यास ती एक लोकप्रिय मॉडलं आहे. 39 वर्षांची आहे. मागच्या काही वर्षांपासून ती 53 वर्षीय अर्जुन रामपालसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांच्या वयात 14 वर्षांचं अंतर आहे. वय मात्र त्यांच्या प्रेमात कधी आडवं आलं नाही.

ग्रॅबिएला आणि अर्जुन अनेक वर्षांपासून लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहतायत. लग्न न करताच या जोडप्याला दोन मुलं आहेत. अजूनपर्यंत त्यांनी आपल्या नात्यावर लग्नाची मोहोर उमटवलेली नाही.