Arjun Tendulkar and saaniya chandok Wedding : अर्जुन तेंडुलकर – सानिया चंडोक यांचे शुभमंगल, सचिनच्या मुलाची किती आहे कमाई ?
महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही क्रिकेटर आहे. घरगुती क्रिकेट शिवाय अर्जुन आयपीएलमध्ये देखील सक्रीय आहे. अर्जुन याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू झालेला नाही.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली आहे. अर्जुन तेंडुलकर याचा लग्न मुंबईत गुरुवारीत मुंबईत थाटामाटात पार पडले आहे.अर्जुन याचा विवाह बिझनस घराण्यातील सानिया चंडोक हिच्या संपन्न झाला आहे. (Photo: PTI)

सर्वसाधारणपणे आयपीएच्या मैदानात दिसणारा अर्जुन तेंडुलकर या विवाहामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या बद्दल चाहत्यांना फारसी माहिती नाही. अर्जुन याची नेटवर्थ किती आहे. त्याची कमाई किती आहे याची चाहत्यांना उत्सुकता आहे. (Photo: PTI)

अर्जुन तेंडुलकर याची नेटवर्थ किती आहे. याची कोणतीही आकडेवारी नाही. परंतू त्याच्या कमाईचे सोर्स काय आहेत. त्या संदर्भात आपण माहिती घेऊ शकता. सचिन तेंडुलकर याच्या मुलाच्या कमाईचे साधन केवळ क्रिकेट आहे. (Photo: Instagram)

अर्जुन तेंडुलकर गेल्या चार ते पाच सिझनपासून आयपीएल खेळत आहे. आधी तो मुंबई इंडियन्समध्ये होता. आता तो लखनऊ सुपर जायंट्स या टीममधून खेळतो. त्याला सुरुवातीला 20 लाख पगार मिळत होता. आणि या वेळेच्या एका आयपीएल सिझनसाठी त्याला 30 लाख सॅलरी मिळेल. (Photo: Instagram)

या शिवाय अर्जुनला गोव्याच्या वतीने रणजी ट्रॉफी मॅच खेळल्यानंतर एक दिवसाचे 50 हजार रुपये मिळतात. याच प्रकारे टीमसाठी विजय हजारे ट्रॉफीमध्ये एका सामन्यासाठी त्याला 50 हजार रुपये फी म्हणून मिळते.तसेच सैयद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 मॅचसाठी 17,500 रुपये मॅच फी मिळते. (Photo: Instagram)