Arshdeep Singh : मैदानात उतरला अन् जसप्रीत बुमराहसोबत लागलं अर्शदीपचं नाव, कोणत्या विक्रमाला गवसणी?
भारत-न्यूझीलंड पहिल्या टी-20 सामन्यात अर्शदीप सिंगने मोठा टप्पा गाठला. 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत त्याने जसप्रीत बुमराहची बरोबरी केली. पण सर्वाधिक सामने खेळणाऱ्या भारतीयांच्या यादीत कोण आघाडीवर आहे?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात मैदानात उतरताच अर्शदीप सिंगने आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील 100 सामने पूर्ण केले.
अर्शदीप सिंगने 100 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या विक्रमात जसप्रीत बुमराहची बरोबरी केली आहे. दोघांनीही भारतासाठी 100 टी-20 सामने खेळले आहेत.
अर्शदीप सिंग हा भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत 146 विकेट्सची नोंद आहे.
भारतासाठी सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा 159 सामन्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. हार्दिक पंड्या 138 आणि विराट कोहली 125 सामन्यांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 113 टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 100 सामने खेळत या यादीत संयुक्तपणे पाचवे स्थान मिळवले आहे.