रणवीर सिंगच्या अभिनेत्रीला डेट करतोय अर्शदीप सिंह? ‘मिस्ट्री गर्ल’सोबत काही फोटो समोर येताच…

भारतीय क्रिकेटर अर्शदीप सिंह गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. कारण, सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या त्याच्या काही मिस्टीरियस फोटोंनंतर त्याच्या खासगी आयुष्याच्या चर्चांना उधाण आलं आहे... अशात चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे की, अर्शदीप कोणाला डेट करत आहे...

| Updated on: Apr 11, 2026 | 2:36 PM
1 / 6
व्हायरल होत असलेल्या फोटो अर्शदीप सिंह कोणत्या मुलीचा हात पकडताना दिसत आहे... पण ती मुलगी नक्की कोण आहे... याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही...पण फोटोतील मुलीच्या  हातावर असलेला टॅटू आणि स्टाईलमुळे अनेकांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे...

व्हायरल होत असलेल्या फोटो अर्शदीप सिंह कोणत्या मुलीचा हात पकडताना दिसत आहे... पण ती मुलगी नक्की कोण आहे... याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही...पण फोटोतील मुलीच्या हातावर असलेला टॅटू आणि स्टाईलमुळे अनेकांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे...

2 / 6

फोटो व्हायरल होताच, सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे... ही मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कोणी नाही तर, पंजाबी अभिनेत्री समरीन कौर असू शकते... कारण अनेकांनी दावा केला आहे की, फोटोमध्ये दिसणारा टॅटू मिळता जुळता आहे...

3 / 6

दरम्यान, समरीन कौरचे काही फोटोही व्हायरल झाले, ज्यामध्ये ती स्टेडियममध्ये आयपीएल सामन्यादरम्यान पंजाब किंग्सला पाठिंबा देताना दिसली, त्यामुळे या दोघांमध्ये संबंध असल्याच्या चर्चांना अधिकच जोर आला.

4 / 6

समरीन कौर ही पंजाबी इंडस्ट्रीमधील एक अभिनेत्री आहे, जी हळूहळू स्वतःचे स्थान निर्माण करत आहे आणि तिने म्युझिक व्हिडिओंसह अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. तिने अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये लोकप्रियता मिळवली आहे.

5 / 6

सर्वात महत्त्वाचं म्हणजे समरीन कौर हिने रणवीर सिंग स्टारर '83' या सिनेमात देखील काम केलं आहे. सिनेमा 1983 च्या क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित होता आणि या सिनेमात तिने क्रिकेटपटूच्या होणाऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती.

6 / 6

पण, अद्यार अर्शदीप सिंह आणि समरीन कौर यांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. पण व्हायरल फोटो समोर आल्यानंतर, सर्वत्र दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. समरीन सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us