World Mental Health Day | दीपिका पादुकोण ते ऋतिक रोशन या कलाकारांनी केली मानसिक आजारांवर मात

डिप्रेशन, अँझायटीनं कुणीही ग्रस्त असू शकतं. बॉलिवूडमधील अनेक कलाकार याला सामोरे गेले आहेत. दीपिका पादुकोण : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण स्वत: डिप्रेशनमधून बाहेर आली आहे. त्यामुळे या विषयांवर बोलण्यासाठी दीपिका नेहमीच पुढाकार घेते. तिनं डिप्रेशनमध्ये असलेल्या लोकांसाठी एक संस्था सुरु केली आहे.

ऋतिक रोशन : ऋतिक रोशनही डिप्रेशनला सामोरा गेला आहे. काळानुसार आता त्याला डिप्रेशनमधून बाहेर पडण्यात यश आलं आहे. त्यामुळे आता तो या विषयावर बोलण्यासाठी नेहमी पुढे येत असतो.

अनुष्का शर्मा: काही दिवसांपूर्वी संपूर्ण कुटुंबालाच अँझायटीचा त्रास असल्याचा खुलासा अनुष्का शर्माने केला होता. एवढंच नाही तर अनुष्का मानसिक आजारासाठी औषधं घेत असल्याचेही तिने सांगितलं आहे. शारीरिक आजाराप्रमाणेच मानसिक आजारही सामान्य आजार असल्याचं अनुष्काने म्हटलं आहे.

करण जोहर: निर्माता- दिग्दर्शक करण जोहरही डिप्रेशन आणि अँझायटीला सामोरा गेला आहे. योग्य वेळेवर उपचार घेतल्यानं यातुन वेळेत बाहेर निघणं शक्य होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण करण जोहर आहे.

इलियाना डिक्रूज : अभिनेत्री इलियाना डिक्रूजही बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डरमधून बाहेर पडली आहे. हा एक मानसिक आजार आहे . एका मुलाखतीत इलियानानं याबाबत सांगितलं होतं.