रातोरात बनला स्टार, यशाच्या शिखरावर असतानाच लकव्याचा झटका; आज अभिनेत्याची स्थिती अशी की…

सिनेसृष्टीतील कलाकारांचा जीवन प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला असतो. आपण त्यांना इतक्या ग्लेमरस जगात बघत असतो मात्र त्या जागेवर पोहोचे पर्यंत अनेक अभिनेत्यांनी मोठा संघर्ष केलेला असतो. अशीच गोष्ट आहे डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अभिनेत्याची. त्याने अभिनयातून लोकप्रियता मिळवली. मात्र, त्यांनी काही वर्षंपूर्वी एका मोठ्या दुखापतीचा समाना केला होता.

| Updated on: Oct 18, 2026 | 6:07 PM
1 / 5
अरविंद स्वामी यांनी 1991 मध्ये मणिरत्नम यांच्या ‘थलपती’ चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. 1992 मधील ‘रोजा’ चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर ‘बॉम्बे’ आणि ‘मिनसारा कनवू’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

अरविंद स्वामी यांनी 1991 मध्ये मणिरत्नम यांच्या ‘थलपती’ चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. 1992 मधील ‘रोजा’ चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर ‘बॉम्बे’ आणि ‘मिनसारा कनवू’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

2 / 5

अरविंद यांना सुरुवातीला डॉक्टर व्हायचे होते. मात्र, वडील व्ही.डी. स्वामी यांनी त्यांना व्यवसायाकडे वळण्याचा सल्ला दिला. त्यांनी बी.कॉम. पूर्ण करून अमेरिकेत आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

3 / 5

2000 च्या दशकाच्या मध्यात झालेल्या अपघातात त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली(लकवा). एका पायावरही परिणाम झाल्याने त्यांना सावरण्यासाठी 4 ते 5 वर्षे लागली. या काळात त्यांच्या फिटनेसवरही परिणाम झाला.

4 / 5

2000 च्या दशकाच्या सुरुवातीला अरविंद यांनी अभिनयापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वडिलांच्या कंपनीत काम केले आणि पुढे टॅलेंट मॅक्सिमस इंडिया ही कंपनी स्थापन केली. ही कंपनी एचआर आणि पेरोल सेवा पुरवते.

5 / 5

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us