मुंबईतील हॉटेलमध्ये 365 दिवस बुक असायची ती रुम, भाडं तब्बल..; भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहे. आता खरातप्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका फाइव्ह स्टार हॉटेल रुममधून खरात हवाला रॅकेट चालवत असल्याचं माहिती आहे.

| Updated on: Apr 05, 2026 | 10:00 AM
1 / 5
भोंदू अशोक खरात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. अशोक खरात हा मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती आहे. यासाठी हॉटेलमध्ये एका दिवसाला 25 हजार रुपये भाडं असलेलं विशेष सूट (रुम) त्याने बुक केलं होतं.

भोंदू अशोक खरात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. अशोक खरात हा मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती आहे. यासाठी हॉटेलमध्ये एका दिवसाला 25 हजार रुपये भाडं असलेलं विशेष सूट (रुम) त्याने बुक केलं होतं.

2 / 5

फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये वर्षाच्या 365 दिवस ही रुम बुक असायची. याच हॉटेल रुममधून कोट्यवधी रुपयांची देवाण-घेवाण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हवाला रॅकेटचं दुबई कनेक्शन समोर येण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

3 / 5

भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटी चौकशीत हवाला रॅकेटसंदर्भात काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती आहे. खरातचं प्रकरण फक्त राज्यापुरतं मर्यादित नसून इतर भागांपर्यंत त्याची व्याप्ती असल्याचं, एसआयटीने कोर्टाच्या सुनावणीदरम्यान म्हटलं होतं.

4 / 5

अशोक खरात यने जादूटोण्यासह ऑस्ट्रेलिया, दुबई यासह पाच देशांत हवालाच्या माध्यमातून पैसे पाठविले आहेत. राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे हजारो कोटींचा त्यात समावेश आहे, त्यामुळे खराची ईडीकडून चौकशी करावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

5 / 5

भोंदू खरातच्या मागे एक मोठं रॅकेट कार्यरत आहे. त्यामुळे देशाची सुरक्षा अडचणीत आली आहे. याबाबत राज्य सरकारकडे असलेले सर्व पुरावे केंद्र सरकारकडे द्यावेत, केंद्रीय संस्थांनी या प्रकरणाची कसून चौकशी करावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us