मर्डर मिस्ट्री असावी तर अशी.. डोकं चक्रावून टाकणारी कथा, ओटीटीवर ठरतोय ‘मस्ट वॉच’

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हा चित्रपट 'मस्ट वॉच' ठरत आहे. ज्यांना मर्डर मिस्ट्री आणि क्राइम ड्रामा आवडतो, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

| Updated on: Sep 04, 2026 | 1:58 PM
1 / 5
या चित्रपटाची कथा बेबी नावाच्या एका पोलिस अधिकाऱ्याभोवती फिरते. घर आणि नोकरी या दोन्ही आघाड्यांवर संघर्ष करणाऱ्या बेबीला आपल्या कुटुंबातील एका कार्यक्रमासाठी सुट्टी हवी असते. त्यासाठी ती एका खोट्या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारते आणि मध्य प्रदेशातील रेवाला जाते. रेवामध्ये तिची भेट लहानपणीचा मित्र बंसी याच्याशी होते. मात्र, त्याच रात्री बंसीची हत्या होते आणि संपूर्ण परिस्थिती बदलते.

या चित्रपटाची कथा बेबी नावाच्या एका पोलिस अधिकाऱ्याभोवती फिरते. घर आणि नोकरी या दोन्ही आघाड्यांवर संघर्ष करणाऱ्या बेबीला आपल्या कुटुंबातील एका कार्यक्रमासाठी सुट्टी हवी असते. त्यासाठी ती एका खोट्या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारते आणि मध्य प्रदेशातील रेवाला जाते. रेवामध्ये तिची भेट लहानपणीचा मित्र बंसी याच्याशी होते. मात्र, त्याच रात्री बंसीची हत्या होते आणि संपूर्ण परिस्थिती बदलते.

2 / 5

स्थानिक पोलिसांकडून अपेक्षित मदत मिळत नसताना बेबी स्वतःच या हत्येचा तपास करण्याचा निर्णय घेते. तपास करताना तिला अनेक कौटुंबिक रहस्यं आणि विश्वासघात समोर येतात. या चित्रपटाची खासियत म्हणजे हा केवळ हत्येचा तपास करणारा चित्रपट नाही. यात एका महिला पोलिस अधिकाऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षालाही महत्त्व देण्यात आलं आहे. घरात पती आणि सासरच्या मंडळींकडून होणारी उपेक्षा, नोकरीच्या ठिकाणी पुरुषप्रधान मानसिकतेचा सामना आणि त्याचवेळी हत्येचं गूढ सोडवण्याची जबाबदारी अशा अनेक गोष्टी कथेत पाहायला मिळतात.

3 / 5

बेबीच्या व्यक्तिरेखेतून स्वतःचा आवाज आणि आत्मविश्वास शोधणाऱ्या महिलेची कहाणी मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे क्राइमसोबतच चित्रपटात सामाजिक आणि कौटुंबिक मुद्द्यांनाही स्पर्श केला जातो. बेबीची भूमिका साकारणाऱ्या निमिषा सजयनच्या अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे. व्यक्तिरेखेतील असुरक्षितता, धडपड आणि तपास करताना वाढत जाणारा आत्मविश्वास त्यांनी प्रभावीपणे साकारल्याचं समीक्षकांचं मत आहे.

4 / 5

बरुण सोबतीची भूमिका तुलनेने मर्यादित असली तरी त्यानेही त्याच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. अंशुमान पुष्कर आणि राजेश कुमार यांनी दमदार अभिनय केला आहे. या चित्रपटाची सुरुवात उत्सुकता निर्माण करणारी आहे. हत्या नेमकी कोणी केली, त्यामागचं कारण काय आणि तपास करताना बेबीसमोर कोणती आव्हानं येणार, यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता टिकून राहते.

5 / 5

‘बबिता सिंह रिपोर्टिंग’ हा चित्रपट 28 ऑगस्ट 2026 रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. यात निमिषा सजयन, बरुण सोबती आणि अंशुमान पुष्कर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. निमिषा सजयनचा दमदार अभिनय, ग्रामीण पार्श्वभूमी, कौटुंबिक संघर्ष आणि मर्डर मिस्ट्रीचा तडका यामुळे ‘बबिता सिंह रिपोर्टिंग’ हा ओटीटीवरील क्राइम ड्रामा आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी पाहण्यासारखा पर्याय ठरू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us