हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ

प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा एका चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट यूट्यूबवर प्रदर्शित होताच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

| Updated on: Apr 11, 2026 | 9:06 AM
1 / 6
हिंदी किंवा भोजपुरी चित्रपटांमध्ये शिव्या आणि बोल्ड सीन्स आता सामान्य झाले आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मवर तर अशा प्रकारचा मजकूर अजूनही खुलेपणाने दाखवला जातो. मात्र, सेन्सॉर बोर्ड अनेकदा अशा चित्रपटांवर कात्री चालवते. तरीही काही चित्रपट असे असतात, जे वादग्रस्त ठरूनही प्रेक्षकांच्या चर्चेत वर्षानुवर्षे टिकून राहतात.

2 / 6
अशाच एका मराठी चित्रपटाची सध्या यूट्यूबवर जोरदार चर्चा सुरू आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावर धाडसी आणि अत्यंत वादग्रस्त दृश्यांमुळे बंदी घालण्यात आली होती. पण आता हाच चित्रपट यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.

3 / 6
या चित्रपटाचे नाव आहे ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा.’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केले आहे. कथानक फिरते एका १५-१६ वर्षांच्या किशोरवयीन मुलाभोवती. त्याचे वडील एक गँगस्टर असतात आणि गँगवॉरमध्ये त्यांचा मृत्यू होतो. वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा लहान मुलगा गुन्हेगारी जगात उतरतो. वयाने लहान असूनही त्याचा धारदार आणि धूर्त मेंदू प्रेक्षकांना हादरवून सोडतो.

4 / 6
चित्रपटात गुन्हेगारी जगाचे भीषण वास्तव इतक्या उघडपणे दाखवले आहे की, भल्याभल्यांच्या अंगावर काटा येतो. यातील हिंसाचार आणि बोल्ड (अश्लील) दृश्ये इतकी स्पष्टपणे मांडली आहेत की, ही फिल्म कुटुंबासोबत अजिबात पाहता येत नाही.

5 / 6
चित्रपटात अल्पवयीन मुलाने काम केल्यामुळे आणि कथानकातील अत्यंत संवेदनशील व बोल्ड दृश्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रपटात एका किशोरवयीन मुलाचे प्रौढ महिलेशी असलेले लैंगिक संबंध दाखवल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे महाराष्ट्रभर पालक आणि गिरणगावातील लोकांमध्ये प्रचंड संताप उसळला होता. या प्रकरणात महेश मांजरेकरांवर गुन्हाही दाखल झाला होता.

6 / 6
वाद आणि बंदीनंतरही हा चित्रपट आता यूट्यूबवर जोरदार गाजत आहे. ‘एनएच मराठी’ या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असलेल्या या चित्रपटाला आतापर्यंत ३६ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. वादग्रस्त विषय, धाडसी दृश्ये आणि वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा या चित्रपटाकडे आकर्षित होत आहेत. मात्र, चित्रपटातील अत्यंत बोल्ड आणि अस्वस्थ करणारे दृश्य पाहता बहुतेक प्रेक्षक एकट्याने पाहण्याचा सल्ला देत आहेत.

Follow Us