बाप, नाना, साली आणि सुअर… भारतातील रेल्वे स्टेशनची नावे ऐकताच हसून दुखू लागेल पोट, तिसऱ्या रेल्वे स्टेशनचं नाव तर….
ट्रेनमध्ये सर्व भारतीयांची लाईफ लाईन आहे... भारतीय रेल्वे अमेरिका, चीन आणि रशिया नंतर देशातील चौथा सर्वात मोठी रेल्वे नेटवर्क असलेला देश आहे. लाखो लोक रोज ट्रेनने प्रवास करतात. मुंबई तर लोकल रेल्वेवर आधारित आहे... पण भारतातील काही रेल्वे स्टेशनची नावं अशी आहे, जी ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही...

राजस्थान येथील जोधपूर स्थित एक छोटा रेल्वे स्थानक आहे, त्या रेल्वे स्थानाकाचं नाव बाप असं आहे. बीबीनगर रेल्वे स्टेशन तेलंगणाच्या भुवनेश्वर जिल्ह्यात दक्षिण मध्य रेल्वेच्या विजयवाडा विभागात आहे.

बाप नंतर नाना नावाचं देखील एक रेल्वे स्टेशन आहे. नाना नावाचं रेल्वे स्टेशन राजस्थान येथे आहे.. नाना नावाचं स्टेशनचं नाव ऐकून तुम्ही देथील चकित झाले असाल..

साली नावाचं देखील स्टेशन आहे. साली म्हणजे मराठीत मेहुणी... साली रेल्वे स्टेशन जोधपूर जिल्ह्यातील दुडू येथे आहे. ते उत्तर पश्चिम रेल्वेशी जोडलेले आहे. तर, साली रेल्वे स्टेशन मध्य प्रदेशात भोपाळ आणि इटारसीजवळ आहे. ते मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात येते.

चाचा म्हणजे काका... ओढनिया चाचा नावाचं देखील एक स्टेशल आहे. हे स्टेशन राजस्थानमधील पोखकरच्या अगदी जवळ आहे. 'ओढणी' या शब्दासोबत 'चाचा' हा शब्द का वापरला जातो, हे आम्हाला अजूनही कळत नाही.

नात्यांच्या नावानेच नाही तर, प्राण्यांच्या नावाने देखील काही स्टेशन भारतात आहेत. सुअर म्हणून देखील एक स्टेशन आहे. उत्तर प्रदेश येथील रामपूर जिल्ह्यात एक गाव आहे. रामपूर, मुराबाद आणि अमरोहा सुअर रेल्वे स्टेशन जवळ आहे... तर काळा बकरा म्हणून देखील स्टेशन आहे.

बिल्ली जंक्शन स्टेशन उत्तर प्रदेश येथील सोनभद्र जिल्ह्यात आहे.. हे देखील एक छोटं गाव आहे. कुत्ता नावाचं देखील स्टेशन आहे, जे कर्नाटक येथे आहे...

दारू नावाचं देखील एक स्टेशन भारतात आहे. दारु नावाचं देखील स्टेशन आहे हे ऐकल्यानंतर तुम्ही अवाक् झाला असाल... दारू हे खरं तर झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील एक गाव आहे आणि स्टेशनचे नाव त्यावरून ठेवण्यात आलं आहे.