काचा फोडल्या, तलवार दाखवून आत शिरला अन्…, बीडमध्ये भाजप नेत्याच्या घरात दरोडा, लाखोंचा ऐवज लंपास

भाजप तालुकाध्यक्ष मनोज पाटील यांच्या पिंपळनेर येथील घरावर सशस्त्र दरोडा पडला आहे. आरोपी योगिराज नरवडेने तलवार आणि लोखंडी पाईपचा धाक दाखवून मनोज पाटील यांचे बंधू सतीश पाटील यांना धमकावले.

| Updated on: Oct 06, 2025 | 1:11 PM
1 / 5
भारतीय जनता पार्टीचे बीड तालुकाध्यक्ष मनोज पाटील यांच्या पिंपळनेर येथील घरावर सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2 / 5
मनोज पाटील यांचे बंधू सतीश पाटील हे पिंपळनेर येथील त्यांच्या घरी एकटे असताना ही घटना घडली. आरोपी योगिराज नरवडे हा तलवार आणि लोखंडी पाईप घेऊन त्यांच्या घरी आला.

3 / 5
आरोपी योगिराज नरवडे याने घरात प्रवेश करण्यापूर्वीच दहशतीचे वातावरण निर्माण केले. त्याने घरावर, घरासमोर उभ्या असलेल्या मोटारसायकलवर आणि मिक्सर मशीनवर दगडफेक केली. तसेच घराच्या खिडक्यांच्या काचा फोडून मोठे नुकसान केले.

4 / 5
यानंतर तलवार आणि लोखंडी पाईपचा धाक दाखवत आरोपीने सतीश पाटील यांना धमकावले आणि घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेली ९० हजार रोख रक्कम आणि सहा तोळे सोन्याचा हार असा एकूण ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपीने जबरदस्तीने चोरून नेला.

5 / 5
चोरी करताना आरोपीने सतीश पाटील यांना शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या गंभीर घटनेप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात आरोपी योगिराज नरवडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळनेर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.