मुंबईजवळ असणाऱ्या या ठिकाणाला विदेशातून भेट देण्यासाठी येतात लोक, स्वर्गापेक्षाही सुंदर ठिकाण
मुंबई पासून फक्त 83 किलोमीटरवर आहे स्वर्गापेक्षाही अतिशय सुंदर ठिकाण. जेथे मुंबई नाही तर विदेशातून भेट देण्यासाठी येतात लोक.

मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण शांततेत आणि निसर्गाच्या सान्निध्यात घालवायचे असेल तर हे एक ठिकाण उत्तम पर्यटनस्थळ ठरू शकते. मुंबईपासून अवघ्या 83 किलोमीटर अंतरावर वसलेले हे सुंदर हिल स्टेशन आपल्या निसर्गसौंदर्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करते.

माथेरान हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेले एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 2,625 फूट उंचीवर असलेल्या या ठिकाणाला महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते.

माथेरानचे वैशिष्ट्य म्हणजे येथील स्वच्छ वातावरण, हिरव्यागार डोंगररांगा आणि धुक्याने वेढलेले रमणीय दृश्य. वर्षभर येथे आल्हाददायक वातावरण असते, मात्र पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य आणखी खुलून दिसते.

माथेरानमध्ये अनेकदा ढग इतके खाली उतरतात की संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत हरवून जातो. त्यामुळे पर्यटकांना जणू काही स्वर्गीय वातावरणाचा अनुभव मिळतो. याच कारणामुळे देशातीलच नाही तर परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने येथे भेट देतात.

माथेरान हे हिरव्यागार परिसरासाठी आणि मनमोहक धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील विविध ठिकाणांवरून दिसणारे डोंगर-दऱ्यांचे दृश्य पर्यटकांना भुरळ घालते. पावसाळ्यात परिसरातील धबधबे आणि ओसंडून वाहणारे झरे निसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण ठरतात.