हैदराबादजवळ आहे स्वर्गापेक्षा सुंदर ठिकाण, एकदा गेलात तर परत-परत जाल

धावपळ आणि दररोजच्या गोंगाटापासून निवांत निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल तर हैदराबादजवळच्या या ठिकाणाला भेट द्या. एकदा गेलात तर पुन्हा परत येण्याची होणार नाही इच्छा.

| Updated on: Jun 08, 2026 | 2:55 PM
1 / 5
शहरातील धावपळ आणि गोंगाटापासून काही काळ दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल तर तेलंगणातील अनंतगिरी हिल्स हे ठिकाण पर्यटकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकते. तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यात असलेले हे निसर्गरम्य हिल स्टेशन हैदराबादपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे.

2 / 5

दाट जंगल, हिरव्यागार टेकड्या, सुंदर दऱ्या आणि मनमोहक निसर्गदृश्यांमुळे अनंतगिरी हिल्सला तेलंगणातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. विशेषतः विकेंडला शहराबाहेर शांत वातावरणात वेळ घालवू इच्छिणाऱ्या पर्यटकांची येथे मोठी गर्दी पाहायला मिळते.

3 / 5

निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण खास आकर्षण आहे. येथील टेकड्यांवर ट्रेकिंगची सुविधा असून निसर्गाच्या सान्निध्यात रोमांचक अनुभव घेता येतो. याशिवाय परिसरातील झरे, हिरवाईने नटलेले जंगल आणि विहंगम दृश्ये पर्यटकांना भुरळ घालतात.

4 / 5

विशेष म्हणजे, प्रसिद्ध मुसी नदीचा उगम अनंतगिरीच्या डोंगररांगांमधून होतो. त्यामुळे या परिसराचे नैसर्गिक महत्त्व अधिक वाढते. सकाळच्या धुक्यात हरवलेल्या टेकड्या आणि प्रसन्न वातावरणामुळे हे ठिकाण फोटोग्राफीसाठीही लोकप्रिय आहे.

5 / 5

हैदराबादजवळ कमी अंतरावर असलेले आणि निसर्गसौंदर्याने नटलेले अनंतगिरी हिल स्टेशन हे कुटुंब, मित्रमंडळी किंवा साहसप्रेमी पर्यटकांसाठी विकेंड ट्रिपचे एक आदर्श ठिकाण ठरू शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us