Ashok Kharat Case : लिंगपिसाट खरातला आवरा रे..! “मी अवतारी पुरुष” म्हणत गर्भवती महिलेला… तपासात हादरवणारा प्रकार उघड

भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटी तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातने महिलांना शोषण करून गर्भपात गोळ्या पुरवल्याचे उघड झाले. नाशिकमधील काही बड्या डॉक्टरांनी यात मदत केल्याचा संशय आहे, त्यांना लवकरच चौकशीसाठी बोलावणार आहेत. या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता असून वैद्यकीय क्षेत्रातील सहभाग तपासला जात आहे.

| Updated on: Apr 23, 2026 | 8:43 AM
1 / 6
अनेक महिलांना फसवून त्यांचे लैंगिक शोषण करणारा आणि त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करणारा तथाकथित ज्योतिषी, भोंदू अशोक खरातचे अनेक गोरखधंदे बाहेर पडत आहेत. महिन्याभरापासून अटकेत असलेल्या खरातचे काळे कारनामे उघड होत असून एसआयटी कडून  याप्रकरणात कसून चौकशी, तसेच तपास करण्यात येत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

2 / 6
एका पीडित महिलेच्या गर्भपात प्रकरण गुन्ह्यात चौकशीदरम्यान काही नवे धक्कादायक खुलासे झाले आहेत. नाशिकमधील काही बड्या डॉक्टरांसह महापालिकेतील एका डॉक्टरने देखील भोंदू अशोक खरात याला मदत केल्याचा संशय आहे.

3 / 6
डॉक्टरांमार्फत खरातला गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याचा आरोप होत असून संबंधित डॉक्टरांना लवकरच चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.

4 / 6
भोंदू खरात याने स्वतःला “अवतारी पुरुष” सांगून महिलांना जाळ्यात ओढलं. त्यांच्या वैयक्तिक समस्यांवर तोडगा काढण्याच्या बहाण्याने त्याने महिलांचा विश्वास संपादन करत त्यांचं लैंगिक शोषण केलं.

5 / 6
त्यापैकी एखादी पीडित महिला गरोदर राहिल्यास भोंदू खरात हा तिला गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याची माहिती उघड झाली आहे.  काही डॉक्टर आणि सोनोग्राफी सेंटर्सच्या भूमिकेचाही याप्रकरणाती तपास सुरू आहे.

6 / 6
खरात याने  गर्भपाताच्या गोळ्या कुठून आणल्या, त्याला त्या कोणी पुरवल्या याचाही तपास सुरू असून, संपूर्ण राज्यासह देशालाही हादरवणाऱ्या या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Follow Us