Big Boss : मी अजूनही वर्जिन, No Kissing, मला मर्द हवा, मी मुस्लिम आहे, पण..बिग बॉस विजेत्या अभिनेत्रीने मनातलं सगळं सांगितंल

Big Boss : बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर मला लग्न करायचं होतं, असं या अभिनेत्रीने सांगितलं. पण माझी प्रकृती बघितल्यानंतर लग्नाचा विचार सोडून दिला. माझ्या आरोग्यामुळे जोडीदाराला त्रास व्हावा असं मला वाटत नाही.

| Updated on: May 21, 2026 | 8:48 AM
1 / 5
मी अजूनही वर्जिन आहे अशी टीव्ही अभिनेत्री सना मकबूलने कबुली दिली. 32 वर्षाच्या सनाचं एकवेळ बिझनेसमॅन श्रीकांत बुरेड्डी सोबत अफेयर होतं. पण आता तिचं ब्रेकअप झालं असून नातं तुटल्यानंतरही ते दोघे चांगले मित्र आहेत. आजही आमच्यात बोलणं होतं असा सनाने सांगितलं.

मी अजूनही वर्जिन आहे अशी टीव्ही अभिनेत्री सना मकबूलने कबुली दिली. 32 वर्षाच्या सनाचं एकवेळ बिझनेसमॅन श्रीकांत बुरेड्डी सोबत अफेयर होतं. पण आता तिचं ब्रेकअप झालं असून नातं तुटल्यानंतरही ते दोघे चांगले मित्र आहेत. आजही आमच्यात बोलणं होतं असा सनाने सांगितलं.

2 / 5

फिल्मीज्ञानला दिलेल्या इंटरव्यूमध्ये तिने सांगितलं मी अजूनही वर्जिन आहे. आपल्या धर्मामुळे तू अजूनही वर्जिन आहेस का? असं तिला विचारण्यात आलं. वर्जिन राहण्याचा निर्णय माझा स्वत:चा आहे, असं तिने सांगितलं. माझा कोणावर विश्वास नाही. ते माझं मन मोडू शकतात. मी कुठल्याही डेटिंग App वर नाही असं तिने सांगितलं.

3 / 5

आता माझ्या आयुष्यात कोणी नाहीय. मी कोणाला Kiss केलेलं नाही. माझ्या आयुष्यात रोमान्स नाहीय असं सनाने सांगितलं. मला जंटलमन पार्टनर पाहिजे. मला मुलगा नको, मर्द हवा. माझा धर्म माझ्यासाठी महत्वाचा आहे हे सनाने कबूल केलं.

4 / 5

माझ्या आयुष्यात येणाऱ्या पुरुषाने धर्माबद्दल ओपन असलं पाहिजे. मी इतकी धार्मिक नाहीय. मी हिजाब परिधान करत नाही. मी मुस्लिम आहे. पण थोडी मॉर्डन सुद्धा आहे असं सनाने सांगितलं. मी जशी आहे, तसचं मला रहायचं आहे. त्याने मला बदलावं असं मला वाटत नाही. मला मुस्लिम माणसाबरोबरच लग्न करायचय असं काही नाहीय. माझ्या पार्टनरने माझा धर्म खुल्या मनाने स्वीकारला पाहिजे असं ती म्हणाली.

5 / 5

सना मकबूल बिग बॉस OTT 3 ची विजेती आहे. शो मध्ये तिचं मजबूत व्यक्तीमत्व दिसलं होतं. लोकांनी ती इमेज खूप आवडलेली. तिचा बिनधास्तपणा लोकांना भावला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us