मोठी बातमी! अशोक खरातच्या जाळ्यात दोन महिला पोलीस अधिकारी, नेमकं काय घडलं?

लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. DCP आणि ACP दर्जाच्या महिला अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात होत्या. आता त्या कशासाठी गेल्या होत्या? नेमकं काय घडलं वाचा...

| Updated on: Apr 07, 2026 | 12:19 PM
1 / 6
गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ माजली आहे. दररोज या प्रकरणी वेगवेगळे खुलासे होताना दिसतात. आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन महिला पोलीस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ माजली आहे. दररोज या प्रकरणी वेगवेगळे खुलासे होताना दिसतात. आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन महिला पोलीस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

2 / 6

अशोक खरात प्रकरणात एका IAS अधिकाऱ्यांनंतर आता दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या. या दोघींपैकी एक डीसीपी तर दुसऱ्या एसीपी दर्जाच्या महिला अधिकारी होत्या.

3 / 6

आवडती पोस्टिंग मिळवण्यासाठी त्यांनी अशोक खरात यांच्याकडे धाव घेतली होती का, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांच्या आणि खरात यांच्यात आर्थिक व्यवहार झाले का, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

4 / 6

अशोक खरातने महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिली आहे. महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याने वापरलेल्या ‘ट्रिक्स’ना त्याने ‘विज्ञान’ असे नाव दिल्याचे समोर आले आहे. या काळ्या कारनाम्यात त्याला इतर कुणाची मदत होती का, याचा एसआयटीकडून तपास सुरू आहे.

5 / 6

चमत्कार किंवा वशीकरण नसून, सर्व हातचलाखीने महिलांना धमकावून व शोषण केल्याची कबुली अशोक खरातने दिली आहे. “दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए” असे म्हणत भोंदूगिरी करणाऱ्या खरातने एसआयटीच्या चौकशीत आपल्या काळ्या कारनाम्यांची माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

6 / 6

दरम्यान, अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन पुन्हा एसआयटी पथकाच्या संपर्कात आला आहे. आज त्याची आणि त्याच्या बहिणीचीही चौकशी होणार आहे. अशोक खरातची आज पोलीस कोठडीचा शेवटचा दिवस आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us