पदर खोचला, हातात दांडीया घेतल्या अन्… चित्रा वाघ यांनी धरला ठेका

गावामध्ये गरबाचे आयोजन आणि त्यात सर्वांचा सहभाग ही बाब खूप छान आहे. अशाप्रकारे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळून सण-उत्सव साजरे करण्याची संधी मिळाल्याने खूप समाधान वाटलं, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

| Updated on: Sep 26, 2025 | 12:05 PM
1 / 10
सध्या सर्वत्र नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. नऊ दिवसांच्या या उत्सवात आदिशक्तीची आराधना करण्यासोबतच गरबा आणि दांडियाची क्रेझही पाहायला मिळत आहे.

2 / 10
रात्रीच्या वेळी रंगीबेरंगी रोषणाईत, पारंपरिक वेशभूषा करून, ढोल-ताशांच्या तालावर ताल धरणारे लोक हे नवरात्रीचे खास वैशिष्ट्य असते. विशेष म्हणजे, अशाच उत्सवांमध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरही सहभागी होत आहेत.

3 / 10
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नुकताच वर्धा जिल्ह्यातील आंजी (मोठी) येथील श्रीरंग गरबा उत्सवात उत्साहाने सहभाग घेतला. त्यांनी स्थानिक महिला आणि कार्यकर्त्यांसोबत गरबा खेळण्याचा आनंद घेतला.

4 / 10
ज्यामुळे उत्सवाच्या उत्साहात आणखी भर पडली. इतक्या मोठ्या भाजप नेत्या असूनही त्यांना गरबा खेळताना पाहून नागरिकांमध्ये नवचैतन्य संचारले. यामुळे आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले.

5 / 10
आंजी (मोठी) येथील श्रीरंग गरबा उत्सव समितीच्या वतीने या भव्य गरबा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाला गावकरी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला चित्रा वाघ यांच्यासोबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

6 / 10
यावेळी आमदार राजेश बकाने, शीतल भोयर, जयश्री गफाट, अर्चना वानखेडे, सुनील गफाट यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. चित्रा वाघ यांनी उत्सवात सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे महिलांमध्ये विशेष उत्साह संचारला होता.

7 / 10
उत्सवाच्या या शानदार आयोजनामुळे आंजी (मोठी) येथे धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी माध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांनी गरबा आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला.

8 / 10
गावामध्ये गरबाचे आयोजन आणि त्यात सर्वांचा सहभाग ही बाब खूप छान आहे. अशाप्रकारे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळून सण-उत्सव साजरे करण्याची संधी मिळाल्याने खूप समाधान वाटलं, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

गावामध्ये गरबाचे आयोजन आणि त्यात सर्वांचा सहभाग ही बाब खूप छान आहे. अशाप्रकारे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळून सण-उत्सव साजरे करण्याची संधी मिळाल्याने खूप समाधान वाटलं, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

9 / 10
राजकारणाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून चित्रा वाघ या पारंपरिक गरबा नृत्यात सहभागी झाल्याने नागरिकांमध्ये त्यांच्या साधेपणाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

10 / 10
वर्ध्यातील हा गरबा उत्सव उत्साहाच्या वातावरणात पार पडला. ज्यामध्ये चित्रा वाघ यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.