Nano पेक्षा स्वस्त इलेक्ट्रिक कार, चार्जिंगचे टेन्शन सोडा बॅटरीच बदला… 250 किमीची रेंज
Blinq Mobility Electric Car: आता किफायतशीर इलेक्ट्रिक कार बाजारात येणार आहे. नवीन स्टार्टअप कंपनीने EV मॉडेल तयार केले आहे. ही कार ताशी 250 किमतींची रेंज देणार आहे. तर 2 मिनिटं 48 सेंकदात ती चार्ज होते. तिची किंमत ऑटो रिक्षाच्या घरात असेल.


सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या कारला सुपरचार्ज गरज नाही. या स्टार्टअपने एक कमाल केली. बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानाचा जबरदस्त वापर केला आहे. माध्यमातील दाव्यानुसार, जेव्हा ही कार लाँच होईल, तेव्हा बाजारातील सर्वात स्वस्त कार असेल. स्वॅपिंग पर्यायामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कंपनीने या कारचे नाव अजून जाहीर केलेले नाही. Cartoq या संकेतस्थळाने या कारला कार001 असा कोड दिला आहे. या कंपनीने नुकताच युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ही कार तयार झाल्याचे दिसते. कारमध्ये एक मोठा टचस्क्रीन इन्फोटेंमेंट सिस्टिम दिसत आहे. बॅटरी कमी झाली तर इशारही मिळतो.

ही टाटा नॅनो सारखी मॉडिफाईड लूकची छोटी कार आहे. यामध्ये LED हेडलाईट्स, ग्लॉस ब्लॅक फ्रंट स्ट्रिप आणि कंपनीचा लोगो आहे. कंपोझिट साहित्याचा वापर करण्यात आला आहे. या कारचे वजनही कमी असणार आहे. स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर तयार झालेली ही कार गर्दीत सहज दामटता येईल.

या कारमध्ये 5 प्रवाशी आरामात बसू शकतील. यामध्ये आरामदायक आसनव्यवस्था, क्लीन फिनिश आणि सायलेंट कॅबिन आकर्षक ठरतील. डॅशबोर्डवर रोटरी कंट्रोलरच्या सहाय्याने Swap वा S मोड सक्रिय करता येतो. प्रीमियम टच आणि प्रॅक्टिकल स्टोरेजची सुविधा देण्यात आली आहे.

दाव्यानुसार, ही कार इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर 252 किमी रेंज देईल. बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानामुळे 250 किमीपेक्षा अधिक रेंज मिळेल. तर बॅटरी केवळ 2 मिनिट 48 सेंकदात रिचार्ज करता येईल. या कारमधील बॅटरी स्वॅप करता येणार आहे. तर या कारची किंमत ऑटोरिक्षापेक्षा कमी असल्याचा दावा करण्यात येत आहे.