
अभिनेता राजपाल यादव याच्या खसागी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याचं पहिलं लग्न 1991 मध्ये करुणा हिच्यासोबत झालं. मुलीच्या जन्मानंतर अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीने अखेरचा श्वास घेतला. या दुःखातून स्वतःला सावरण्यासाठी अभिनेत्याला मोठा कालावधी लागला...

पहिल्या पत्नीच्या निधनाच्या अनेक वर्षांनंतर राजपाल याने दुसरं लग्न केलं. राधा हिच्यासोबत अभिनेत्याने दुसरं लग्न केलं. लग्नानंतर प्रत्येक कठीण काळात राधा हिने राजपाल याला भक्कम साथ दिला... एवढंच नाही तर, कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या देखील पार पाडल्या...

राजपाल याला तीन मुली आहे. एक मुलगी पहिल्या पत्नीची तर, दोन मुली दुसऱ्या पत्नीच्या आहे. पण अभिनेत्याच्या घरात एकूण 15 मुलं आहेत. ज्यांचा सांभाळ राधा करत आहे. सध्या सर्वत्र राधा आणि रामपाल यांच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे.

लोकप्रियता आणि यश मिळाल्यानंतर रामपाल याने स्वतःच्या पाच भावांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तर 15 मुलांमध्ये कोणी वकिलीचा तर, कोणी क्रिकेटर होण्याचे स्वप्न पाहात आहे. तर काहींना बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचं आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व मुलं राजपाल याला बाबा म्हणून हाक मारतात.. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेत्या भाचीच्या लग्नात देखील हजेरी लावली. सध्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.