लोकप्रिय अभिनेत्रीच्या खासदार नवऱ्याचं स्वर्गासारखं सुंदर घर, घराचे Inside फोटो समोर
सध्या सर्वत्र बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि खासदार नवऱ्याच्या स्वर्गासारख्या सुंदर घराचे फोटो व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा आहे. परिणिती आणि राघव यांच्या घराचे Inside फोटो व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परिणिती आणि राघव यांनी 24 डिसेंबर 2023 मध्ये लग्न केलं.

लग्नानंतर परिणिती सासदी दिल्लीत आहे. परिणिती हिचं दिल्लीतील घर आलिशान आणि स्वर्गासारखं सुंदर आहे. खुद्द परिणिती हिने घरातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेले. घरातील प्रत्येक कोपरा अत्यंत सुंदर आहे.

परिणिती आणि राघव यांचा दिल्ली आलिशान बंगला आहे. जो पांढऱ्या थिमने सजवण्यात आला आहे... दोघांचं घर दिसायला एखाद्या महलासारखं दिसत आहे. सांगायचं झालं तर, पांढऱ्या रंगामुळे घर भव्य दिसतं आणि सकारात्मकता जाणवते.

घरात परिणिती आणि राघव यांनी मुलासाठी देखील सुंदर खोली तयार केली आहे. गेल्या वर्षी राघव आणि परिणिती यांनी मुलगा नीर याचं जगात स्वागत केलं... मुलाच्या खोलीचा फोटो देखील अभिनेत्रीने शेअर केलेला. तो देखील पांढऱ्या रंगाने सजवण्यात आलाय.

लग्न झाल्यापासून परिणिती झगमगत्या विश्वापासून दूर आहे. पण अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.