काळी मांजर आडवी गेली म्हणजे अपशकुन? जाणून घ्या या मागचं सत्य!

कोळी मांजर आडवी गेली की काही क्षण थांबावं, असं तुम्हीही अनेकदा ऐकलं असेल. पण या समजामागचं नेमकं कारण काय? मांजर उजवीकडून डावीकडे गेली तर खरंच काही अशुभ घडतं का? शतकानुशतकं चालत आलेल्या या समजुतीचा इतिहास आणि त्यामागील रंजक गोष्टी जाणून घ्या.

| Updated on: Oct 19, 2026 | 10:26 AM
1 / 5
एखादी व्यक्ती रस्त्याने चालली असेल आणि अचानक त्या व्यक्तीच्या समोरुन मांजर आडवी गेली तर काही जण अशुभ मानतात. काही जण तर तिथेच थांबतात आणि सात पाऊले पुन्हा मागे येत असल्याची अंधश्रद्धा आहे. पण वैज्ञानिकदृष्ट्या याचा आपल्या आयुष्यातील घटनांशी काहीही संबंध नसतो

2 / 5

जुन्या काळात रात्री प्रवास करताना मांजरीचे चमकणारे डोळे पाहून घोडे किंवा बैल घाबरत असे. त्यामुळे लोक थोडा वेळ थांबायचे. हीच सावधगिरी पुढे अशुभ मानली गेली.

3 / 5

काही लोकांचा विश्वास आहे की मांजर उजवीकडून डावीकडे गेली तर अशुभ. पण ज्योतिषज्ञ आणि तज्ज्ञ सांगतात की याला शास्त्रीय आधार नाही. हे फक्त समज आहे.

4 / 5

ही अंधश्रद्धा मुख्यतः युरोपातील मध्ययुगीन काळातील कल्पनांमुळे पसरली, जिथे काळ्या मांजरीला चेटकीण किंवा वाईट शक्तीशी जोडले जायचे. भारतातही ती रुजली.

5 / 5

काळी मांजर आडवी गेल्याने काहीही अशुभ घडत नाही. मांजर रस्ता ओलांडते, ती फक्त तिच्या मार्गाने जात असते. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us