गोविंदा आलाsss रे आलाsss, शिंदेंच्या शिवसेनेत आला, मुख्यमंत्र्यांनी गोविंदावर सोपवली मोठी जबाबदारी, पाहा फोटो

| Updated on: Mar 28, 2024 | 6:03 PM

लोकसभा निवडणुकीआधी बॉलिवूड कलाकारही राजकीय पक्षांच्या स्टेजवर दिसण्याची शक्यता आहे. गोविंदाने शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर त्याच्यासोबत करिना कपूर आणि करिष्मा कपूर या अभिनेत्रींचीही नावे चर्चेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेशावेळी गोविंदा आहुजा याच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.

1 / 5
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता गोविंदाने शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गोविंदाने शिंदेची भेट घेतली होती. तेव्हापासूनच गोविंदाच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंगल्यावर आधी बैठक झाली त्यानंतर काही वेळातच गोविंदाचा पक्ष प्रवेश झाला.

2 / 5
 आपली इंडस्ट्री मोठी आहे. कलाकारांसह बॅक स्टेजलाही काम करणारे लोक आहेत मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. कोणत्याही अटी शर्तीविना गोविंदा प्रवेश करत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

3 / 5
सगळीकडेचं गोविंदा गोविंदा आहे. कोरोना काळात सर्व सण उत्सव बंद होते. ही बंदी उठवताना पहिला सण हा गोविंदाचा होता हा योगायोग असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

4 / 5
लोकसभा निवडणुकीमध्ये गोविंदा स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी पाहणार आहे. त्यासोबतच चित्रपटसृष्टी आणि सरकारमधील तो दुवा असणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली.

5 / 5
माझा १४ वर्षांचा राजकीय वनवास संपला म्हणत गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.