Pathaan | थिएटरमधील फोटो पाहताच शाहरुख खान याने घेतली रेणुका शहाणेची फिरकी, म्हणाला माझी पहिली हिरोईन…

रेणुका शहाणे हिने सोशल मीडियावर आशुतोष राणा याच्यासोबतचे चित्रपट पाहण्यासाठी जातानाचे आणि थिएटरमधील फोटो शेअर केले आहेत. रेणुका शहाणेची ही पोस्ट रिशेअर करत शाहरुख खान याने खास कमेंट केलीये.

| Updated on: Feb 05, 2023 | 9:56 PM
1 / 5
शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर ताबडतोब कमाई करतोय. पठाण या चित्रपटाला देशामध्येच नाही तर विदेशामध्येही मोठे प्रेम मिळत आहे. पठाण या चित्रपटामध्ये शाहरुख खान, दीपिका पादुकोण यांच्यासह आशुतोष राणा देखील मुख्य भूमिकेत आहे.

2 / 5

आशुतोष राणा हा पठाण चित्रपटामध्ये कर्नल लुथ्राच्या भूमिकेत आहे. म्हणजेच चित्रपटामध्ये आशुतोष राणा हा पठाणच्या बाॅसच्या भूमिकेत आहे. नुकताच आशुतोष राणा हे आपली पत्नी रेणुका शहाणे हिच्यासोबत पठाण चित्रपट पाहण्यास पोहचले होते.

3 / 5

रेणुका शहाणे हिने सोशल मीडियावर आशुतोष राणा याच्यासोबतचे चित्रपट पाहण्यासाठी जातानाचे आणि थिएटरमधील फोटो शेअर केले आहेत. रेणुका शहाणेची ही पोस्ट रिशेअर करत शाहरुख खान याने खास कमेंट केलीये.

4 / 5

शाहरुख खान याने लिहिले की, तुम्ही कर्नल लुथ्राजींना सांगितले का तुम्ही माझी पहिली हिरोईन आहात? किंवा आपण ही गोष्ट गुप्त ठेवली पाहिजे, नाही तर ते मला एजन्सीमधून काढून टाकतील...

5 / 5

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us