Pakistani Actress : हानिया आमीर तिच्यापुढे काहीच नाही, पाकिस्तानची ही अभिनेत्री स्वर्गातली अप्सराच; फोटो पाहून प्रेमात पडाल!
भारतात पाकिस्तानमधील हानिया आमीर ही अभिनेत्री बहुसंख्य लोकांना माहिती आहे. परंतु या मालिकेतील अभिनेत्री नेमकी कोण आहे, याची अनेकांना कल्पना नाही.

पाकिस्तानची सिनेसृष्टी भारताएवढी मोठी नाही. पाकिस्तानचे कलाकार हे भारतीय अभिनेता, अभिनेत्रींचे चाहते आहेत. एवढंच नव्हे तर पाकिस्तानी कलाकार हे भारतीय संगिताच्या खूपच प्रेमात असल्याचे वेळोवेळी समोर आलेले आहे.
पाकिस्तानमधील मालिका या नेहमीच चर्चेचा विषय असतात. भारतातही या मालिका आवडीने पाहिल्या जातात. सध्या अशीच एक मालिका चर्चेचा विषय ठरली आहे. या मालिकेचे नाव डर ए निजात असे आहे. या मालिकेतील अभिनेत्री नेमकी कोण आहे, असे विचारले जातेय.
भारतात पाकिस्तानमधील हानिया आमीर ही अभिनेत्री बहुसंख्य लोकांना माहिती आहे. परंतु या मालिकेतील अभिनेत्री नेमकी कोण आहे, याची अनेकांना कल्पना नाही. या अभिनेत्रीचे नाव 'दूर ए फिशा' असे आहे.
हानिया आमीर एवढी सुंदर कशी? असे विचारताच अनेकजण तिने प्लास्टिक सर्जरी केलेली आहे, असा दावा करतात. परंतु दूर ए फिशा या अभिनेत्रीचे सौंदर्य हे नैसर्गिक आणि निखळ असल्याचे सांगितले जाते.
म्हणूनच या अभिनेत्रीची क्रेझ दिवसेंदिवस वाढतेय. या अभिनेत्रीचे इन्स्टाग्राम खाते भारतात बॅन आहे. परंतु तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर लाखोंनी फॉलोअर्स आहेत. तिची डर ए निजात ही मालिकाही भारतात आवडीने पाहिली जातेय.