Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट आहे का? नव्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी उपस्थित केला प्रश्न

बॉलिवूडची 'दबंग गर्ल' अर्थात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. या व्हेकेशनचे काही फोटो तिने नुकतेच इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. सोनाक्षीने हे फोटो पोस्ट करताच क्षणार्धात ते व्हायरल झाले आणि त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या.

| Updated on: Apr 08, 2022 | 4:53 PM
1 / 5

2 / 5

सोनाक्षीने यावेळी निळ्या आणि हिरव्या रंगसंगतीचा थ्री-पीस को-ऑर्ड सेट परिधान केला होता. निशाळार समुद्र आणि आजूबाजूला असलेली हिरवळ.. अशा निसर्गरम्य ठिकाणी तिने फोटोशूट केलं. मात्र या फोटोशूटवरून तिला सध्या ट्रोल केलं जातंय.

3 / 5

या फोटोंमधील सोनाक्षीचं पोट पाहून ती प्रेग्नंट आहे का, असा सवाल नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये केला आहे. हे प्रेग्नंसी शूट आहे का, असाही प्रश्न एकाने विचारला. तर सोनाक्षीचं बॉडीशेमिंग करू नये, असं तिच्या चाहत्यांनी ट्रोलर्सना सुनावलं.

4 / 5

दुसरीकडे सोनाक्षीच्या या सुंदर ड्रेसचीही चर्चा चाहत्यांमध्ये होत आहे. सोनाक्षीने परिधान केलेल्या या थ्री-पीस सेटची किंमत ही जवळपास साडेदहा हजार रुपयांच्या घरात आहे. संबंधित ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर या ड्रेसची किंमत सांगण्यात आली आहे.

5 / 5

सोनाक्षी मालदीवमध्ये फोटोशूटनिमित्त गेली आहे. याआधी तिने बिकिनी फोटोशूटमधील फोटोसुद्धा इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. मिनिमल मेकअप आणि कॅज्युलअ लूकमधील तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us