Photo : अथांग समुद्र… किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा… 8 बेडरूम… कसं आहे टायगर श्रॉफचं अपार्टमेंट?
अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारानंतर त्याच्या खार येथील आलिशान घराची चर्चा सुरु झाली आहे. जूहू येथील हल्ल्यातून टायगर थोडक्यात बचावला, पण या घटनेने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस संरक्षणाखाली असलेल्या टायगरचे सी-फेसिंग ८-बेडरूम अपार्टमेंट, जिम आणि डान्स स्टुडिओ असलेला भव्य बंगला त्याची शाही जीवनशैली दर्शवतो.

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर जुहू येथे गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यातून टायगर थोडक्यात बचावला आहे. मात्र, त्याच्या हाताला आणि छातीला थोडं खरचटलं आहे. या घटनेमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी टायगरच्या सुरक्षेत तात्काळ वाढ केली आहे. त्याच्या खार येथील घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. खार येथे असलेलं टायगरचं आलिशान घर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कसं आहे टायगरचं हे घर?
टायगर श्रॉफचं घर खार पश्चिमेला प्रीमियम रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट रुस्तमजी पॅरामाउंटमध्ये आहे. हे सी-फेसिंग अपार्टमेंट आहे. इथून मुंबईचा अथांग आणि निळाशार समुद्र पाहता येतो. 8 बेडरूम असणारं हे मोठं अपार्टमेंट आहे. यात मोठा हॉल, अनेक बेडरूम्स, ऑफिस स्पेस, पाऊडर रुम आणि मॉडर्न किचनही आहे.
टायगरच्या घराचं इंटिरिअर व्हाइट, ग्रे, बअलॅक आणि वूड टोनवर आधारीत आहे. भिंतीवर गोल्डन डिटेलिंग, वुडन पॅनल्स आणि शानदार शँडिलियर असल्याने त्यामुळे रॉयल टच दिसून येतो. या घरात टायगरची खास जीम आहे. डान्स स्टुडिओही आहे. या ठिकाणी तो अॅक्शन ट्रेनिंग आणि डान्स प्रॅक्टिसही करतो. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी टायगरकडे करोडोचं घर, महागड्या कार आणि प्रचंड संपत्ती आहे.
टायगरच्या कलेक्शनमध्ये महागड्या कार आणि मोटारसायकल आहेत. त्यात SS जॅग्वार 100, रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू एम, बीएमडब्ल्यू 3-सीरीज ग्रॅन लिमोजिन, बीएमडब्ल्यू 5-सीरीज, मर्सिडीज बेंज ई 220डी, होंडा सिविक आदी कार आहेत. मात्र, टायगर BMW मधूनच प्रवास करणं पसंत करतो.
टायगर हा सर्वाधिक फॅशनेबल आहे. त्याला फॅशन करायला आवडतं. त्याची फॅशन स्टाईल त्याचे चाहते फॉलो करत असतात. तो नेहमी कॅज्युअल टी-शर्ट, स्नीकर्स, जॅकेट आणि सनग्लासेसमध्ये असतो. त्याची स्टाईल साधी वाटत असली तरी त्याच्याकडे असलेल्या वस्तू महागड्या आणि टॉपच्या आहेत.
टायगरला महागड्या घड्याळांची प्रचंड आवड आहे. तो वेगवेगळ्या प्रसंगी स्टायलिश आणि लग्जरी घड्याळ वापरतो. त्याच्या वॉच कलेक्शनमध्ये कॅसियो जी-शॉक, एम्पोरियो अरमानीची ब्लॅक एनालॉग आणि क्रोनोग्राफ घड्याळ आणि ऑडेमार्स पिगे रॉयल ओक आदी मॉडल आहेत. या घड्याळांचं डिझाइन त्याच्या स्पोर्ट्स अंदाजासोबतच त्याची रॉयल आणि क्लासी स्टाईल दाखवते.