जेन-झी, जेन-अल्फा मुलांकडे माहिती, पण…; CM देवेंद्र फडणवीसांचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले
नागपुरातील प्राचार्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांनी हजेरी लावली. या कार्यक्रमातील मुख्यमंत्र्यांचं विधान चर्चेत आलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात प्राचार्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत हजेरी लावली. या परिषदेत त्यांनी सध्याच्या पिढ्यांवर मोठं भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'प्राचार्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले आणि आधीच आभार प्रदर्शन झाल्याने आपण मुख्यमंत्री म्हणून बोलणार आहोत की नाही हा मला प्रश्न पडला. पण माझे भाषण झाल्याने माझी चिंता मिटली आहे
'आयोजक देवेन दस्तुरे यांनी माझा परिचय करुन देताना शोले चित्रपटातील प्रसंग सांगितला. देवेन दस्तुरे यांनी मला शोलेमधील गब्बर सिंग न म्हणता ठाकूर संबोधल्याने बरे झाले, असे फडणवीसांनी सांगितले.
'Gen Z आणि Gen Alpha हे इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन आणि तंत्रज्ञानाच्या एक्सप्लोजनच्या काळात जन्मले आहे. त्यांच्याकडे माहिती आहे. परंतु त्यांच्याकडे ज्ञान नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं.
'त्यामुळे शाळातील शिक्षकाची मोठी जबाबदारी आहे या जनरेशनकडे असलेली माहिती त्यांच्या ज्ञानात भर टाकणारी कशी ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.