तुमची एक चूक आणि वॉशिंग मशीन होईल कायमची बंद; आजच व्हा सावध, नाहीतर पस्तावाल!

वॉशिंग मशीनमध्ये कोणते कपडे धुणे धोकादायक ठरू शकते आणि मशीनची कार्यक्षमता कशी टिकवावी, याबद्दलच्या खास टिप्स येथे जाणून घ्या.

| Updated on: Apr 03, 2026 | 3:03 PM
1 / 8
आजच्या धकाधकीच्या जीवनात वॉशिंग मशीनमुळे कपडे धुण्याचे कष्ट कमी झाले आहेत. आपण अनेकदा आपले सर्वच कपडे मशीनमध्ये धुण्यासाठी टाकतो. पण तुम्हाला माहितीये का, वॉशिंग मशीनमध्ये सर्व प्रकारचे कपडे धुणे सुरक्षित नसते.

2 / 8
तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये टाकलेल्या कपड्यांमुळे केवळ तुमचे महागडे कपडेच खराब होत नाहीत. तर मशीनच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे वॉशिंग मशीनमध्ये कोणते कपडे धुणे टाळावे, याबद्दल जाणून घेऊया.

3 / 8
रेनकोट हे पाणी अडवण्यासाठी खास रबर किंवा प्लॅस्टिक कोटिंगपासून बनवलेले असतात. जेव्हा हे कपडे मशीनमध्ये फिरतात, तेव्हा पाणी कापडाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. यामुळे रेनकोट एखाद्या फुग्यासारखा फुगतो आणि अचानक फाटू शकतो. यामुळे मशीनचे संतुलन बिघडून ड्रमवर मोठा ताण येतो.

4 / 8
एखाद्या खास सण-समारंभासाठी घेतलेले जड आणि महागडे कपडे ज्यावर मणी, टिकल्या किंवा काचेचे काम असते, ते मशीनमध्ये कधीही टाकू नका. मशीनमधील घर्षणामुळे हे मणी निखळतात. सर्वात मोठा धोका म्हणजे हे छोटे मणी मशीनच्या ड्रेनेज पाईपमध्ये किंवा ड्रमच्या बारीक छिद्रांमध्ये अडकतात, ज्यामुळे मशीन जाम होऊ शकते.

5 / 8
नाजूक लोकरीचे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवू नये. लोकरीचे तंतू अत्यंत नाजूक असतात. मशीनमधील गरम पाणी किंवा वेगाने फिरणारा ड्रम यामुळे लोकरीचे कपडे आकसतात किंवा त्यांचा मूळ आकार पूर्णपणे बिघडतो. अनेकदा मशीनमध्ये धुतलेले स्वेटर सैल होऊन घालण्यायोग्य राहत नाहीत. असे कपडे नेहमी हाताने धुणे सुरक्षित असते.

6 / 8
जर कपड्यांवर पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे तेल किंवा मोटर ग्रीसचे डाग असतील, तर ते थेट मशीनमध्ये टाकू नका. हे पदार्थ ज्वलनशील असतात. मशीनमधील मोटरमुळे निर्माण होणारी उष्णता किंवा घर्षणामुळे अशा कपड्यांना आग लागण्याचा धोका असतो. हे कपडे आधी बाहेर साबणाने स्वच्छ करून मगच मशीनमध्ये टाकावेत.

7 / 8
आपण वापरत असलेल्या महागड्या ब्रा किंवा अन्य कपड्यांमध्ये त्याच्या आकारासाठी धातूच्या तारा (Underwires) वापरल्या जातात. मशीनमध्ये धुताना या तारा बाहेर येण्याची दाट शक्यता असते. या तारा मशीनच्या ड्रमला ओरखडे पाडू शकतात. तसेच इतर कपड्यांमध्ये अडकून ते फाडू शकतात.

8 / 8
लेसचे काम असलेले कपडे दिसायला सुंदर असले तरी ते अत्यंत कच्चे असतात. मशीनच्या वेगामुळे लेस फाटू शकते किंवा इतर कपड्यांच्या हुकमध्ये अडकून पूर्ण कापड खराब होऊ शकते.

Follow Us