
आजकाल अनेक घरांत बऱ्याचदा ब्रेड खाल्ला जातो. पण अनेकदा असं घडतं की सँडविच किंवा ब्रेड रोल बनवताना आपण ब्रेडच्या कडा कापून टाकतो. बऱ्याच लोकांना या कडा कठीण वाटतात आणि काही मुलांना तर कडांची चवच आवडत नाही, त्यामुळे त्या न खाता अनेक लोकं कडा टाकून देतात.

पण या उरलेल्या ब्रेडच्या कडा तुमच्या स्वयंपाकघरात चमत्कार करू शकतात, हे तुम्हाला माहित आहे का ? हो, हे खरं आहे. आजच्या काळात महागाई वाढत्ये आहे आणि अन्नाची नासाडी करणं तर आपल्याकडे चांगलं मानत नाहीत. त्यामुळे स्वयंपाकघरातील अगदी लहान पदार्थांचा,वस्तूंचा नीट वापर करणं शहाणपणाचं ठरतं.

जर तुम्हाला तुमच्या रोजच्या स्वयंपाकात काहीतरी नवीन करून पहायचे असेल आणि अन्न वाया जाण्यापासून वाचवायचे असेल तर या टिप्स खूप उपयुक्त ठरतील. ब्रेडच्या उरलेल्या कडा फेकून देण्याऐवजी त्या कशा वापरायच्या ते पाहूया.

घरी कुरकुरीत ब्रेड क्राऊटन्स बनवा: ब्रेडच्या उरलेल्या कडांचा वापर करून तुम्ही घरी कुरकुरीत ब्रेड क्राऊटन्स बनवू शकता. प्रथम कडाचे लहान तुकडे करा. थोडे बटर किंवा ऑलिव्ह ऑइल घाला. मीठ, मिरपूड आणि मिश्र भाज्या घाला. हे सगळं नीट मिक्स करा. त्यानंतर तुम्ही हे तळू शकता, ओव्हनमध्ये बेक करू शकता किंवा एअर फ्रायरमध्येही बेक करू शकता. हे मसालेदार क्राऊटन्स चहा किंवा कॉफीसोबत खूप स्वादिष्ट लागतात.

ब्रेडक्रंब तयार करून साठवा: ब्रेडच्या उरलेल्या कडा वापरून तुम्ही ब्रेडक्रंब्स तयार करू शकता, जे खूप सोपं आहे. त्यासाठी जास्त मेहनत लागत नाही. त्या कडा तव्यावार नीट भाजून कुरकुरीत करा आणि मग त्या मिक्सरमध्ये फिरवून बारीक करा. हे ब्रेडक्रंब्स तुम्ही कटलेट, कबाब, टिक्की किंवा इतर स्नॅक्सवर लावून ते कुरकुरीत करण्यासाठी वापरू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, म्हणजेच हवाबंद जब्यात ठेवले तर ते अनेक दिवस टिकतात.

भाज्यांचे कटलेट्स किंवा कोफ्ते बनवण्यासाठी: उरलेल्या ब्रेडच्या कडा वापरून तुम्ही भाज्यांचे कटलेट्स किंवा कोफ्ते बनवू शकता. ब्रेडच्या उरलेल्या कडा पाण्यात किंवा दुधात भिजवा, त्या पिळून काढा आणि उकडलेले बटाटे, भाज्या आणि मसाल्यांच्या मिश्रणात घाला. यामुळे कटलेट्स मऊ होतील आणि चांगले बांधले जातीत. बाईंडिंग चांगलं होतं.

ब्रेडचा उपमा किंवा ब्रेड चिवडा: उरलेल्या ब्रेडच्या कडा या उपमा किंवा ब्रेड चिवडा बनवण्यासाठी वापरता येतात. कडांचे लहान तुकडे करा आणि थोडं तेल घालून हलके भाजून घ्या तळून घ्या. नंतर तेलावर मोहरी, कढीपत्ता, कांदा आणि काही मसाले कढईत परतून घ्या. त्यावर या परतलेल्या कडा घालून शिजवा.अवघ्या काही मिनिटांत तुमचा छान, पोटभरीचा नाश्ताही तयार होईल.