Tauktae Cyclone PHOTO : तौत्के चक्रीवादळाचे रौद्ररुप, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

| Updated on: May 17, 2021 | 10:07 AM

तौत्के चक्रीवादळामुळे काल रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर आता आणखी वाढला आहे. मुंबईपाठोपाठ ठाणे, नवी मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. (Cyclone Tauktae update photos)

1 / 11
Cyclone Tauktae

Cyclone Tauktae

2 / 11
त्यामुळे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी झाडांची पडझडही पाहायला मिळते. तसेच अनेक ठिकाणी बत्तीही गुल झाली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे.

3 / 11
मुंबई, ठाणे, पालघरसह इतर आजूबाजूच्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत 34 ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

4 / 11
यात मुंबई शहर 11, पश्चिम उपनगर 17, पूर्व उपनगरात 6 ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या गाडयांवर पडल्याने गाड्यांचेही नुकसान झाले आहेत.

5 / 11
सिंधुदुर्गात वाऱ्याचा वेग मंदावला असला, तरी जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. तर नदी नाले वाहू लागले आहेत. यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.

6 / 11
तौत्के चक्रीवादळामुळे काल रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर आता आणखी वाढला आहे. मुंबईपाठोपाठ ठाणे, नवी मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे.

7 / 11
अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबईसह इतर ठिकाणी बत्ती गुल झाली आहे.

8 / 11
रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, सिंधुदुर्ग, आंबोळगड यांसह इतर गावांना चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

9 / 11
रत्नागिरीतील 104 गावांमधील 800 ते 1 हजार घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

10 / 11
तर गोव्यात तौत्के वादळाचा फटका बसला आहे. यामुळे मोठ्या विजेचे खांब कोसळले आहेत. तर अनेक घरांवर झाडं कोसळले आहेत.

11 / 11
 त्याशिवाय मोबाईल सेवा बंद, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तौत्के चक्रीवादळाचा मोठा तडाखा गोव्याला बसला आहे.