जखमी गोविंदांची विचापूस करण्यासाठी रितू तावडे KEM रुग्णालयात

शनिवारी सर्वत्र दहीहंडीची धूम पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तर दुसरीकडे दहीहंडीची धूम सुरू असतानाच काही ठिकाणी गोविंदा जखमी झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. अशात जखमी गोविंदांची विचारपूस करण्यासाठी रितू तावडे रुग्णालयात पोहोचल्या आहेत.

| Updated on: Sep 06, 2026 | 8:55 AM
1 / 5
 मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या मुंबईतील विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिल्या आणि. गोविंदा पथकांचा  उत्साह वाढवला. पण या उत्साहात अनके गोविंदा जखमी आले असून त्यांच्यावर KEM रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या मुंबईतील विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिल्या आणि. गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. पण या उत्साहात अनके गोविंदा जखमी आले असून त्यांच्यावर KEM रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

2 / 5

रितू तावडे यांनी केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांची विचारपूस केली. तर सर्व जखमी गोविंदाना दर्जेदार उपचार मिळाले पाहिजे.. असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, 28 गोविंदांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तर अद्यापही 4 गोविंदांवर उपचार सुरु आहे.

3 / 5

दिवसभर शहराच्या विविध भागांत आयोजित 'दही-हंडी' उत्सवादरम्यान जखमी झालेल्या 'गोविंदां'ची विचारपूस करण्यासाठी महापौरांनी रात्री उशिरा परळ येथील केईएम (KEM) रुग्णालयाला भेट दिली.

4 / 5

शनिवारी मुंबईत दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहाने आणि जोशात साजरा करण्यात आला. 'गोविंदा' पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी शहर आणि उपनगरांमधील विविध दहीहंडी उत्सवांना भेटी दिल्या.

5 / 5

सांगायचं झालं तर, शनिवारी मुंबई मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने दहीहंडीचा आनंद लुटण्यात आला. अनेक सेलिब्रिटींनी येत गोविंदांता उत्साह वाढवला. तर अनेक नृत्यांगनांच्या सादरीकरणाने सर्वच चकित झाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us