एका दिवसात नक्की किती लीटर पेट्रोल खरेदी करता येतं? हा नियम वाचून धक्काच बसेल

आता एका व्यक्तीला दिवसभरात नेमके किती पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करता येते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज आपण याबद्दलचा अधिकृत कायदेशीर नियम काय सांगतो हे जाणून घेऊया.

| Updated on: May 21, 2026 | 3:22 PM
1 / 8
मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी इंधन तुटवड्याची अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परिणामी, अनेक शहरांमधील पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

2 / 8
अनेक नागरिक आणीबाणीच्या प्रसंगासाठी गाड्यांच्या टाक्या फुल करत आहेत, तर काही जण थेट कॅन आणि ड्रम घेऊन पंप गाठत आहेत. या गोंधळात आता एका व्यक्तीला दिवसभरात नेमके किती पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करता येते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज आपण याबद्दलचा अधिकृत कायदेशीर नियम काय सांगतो हे जाणून घेऊया.

3 / 8
जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या वाहनाने जसे की बाईक किंवा कार घेऊन पेट्रोल पंपावर जात असाल, तर दिवसभरात कितीही वेळा आणि कितीही लीटर इंधन खरेदी करण्यावर कोणताही कायदेशीर निर्बंध नाही. तुम्ही तुमच्या वाहनाची टाकी पूर्णपणे भरू शकता. मात्र, जेव्हा एखाद्या विशिष्ट भागात इंधनाचा प्रचंड तुटवडा किंवा घबराट निर्माण होते. तेव्हा स्थानिक जिल्हा प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात काही नियम घालू शकतात.

4 / 8
यानुसार प्रति वाहन ठराविक रकमेच्या इंधन खरेदीची मर्यादा घातली जाऊ शकते. पण हा कायमस्वरूपी नियम नसून तात्पुरती खबरदारी असते, जी सामान्य परिस्थितीत लागू होत नाही. वाहनाशिवाय वेगळे किंवा सुटे इंधन खरेदी करण्याबाबत मात्र 'पेट्रोलियम नियम २००२' नुसार कडक नियम लागू करण्यात आले आहेत.

5 / 8
सामान्य रिटेल पेट्रोल पंपावरून कोणताही सर्वसामान्य ग्राहक एका वेळी किंवा दिवसभरात २०० लीटरपेक्षा जास्त इंधन थेट खरेदी करू शकत नाही. आणीबाणीच्या प्रसंगी १ ते ५ लीटर सुटे पेट्रोल हवे असल्यास, ते कोणत्याही साध्या प्लास्टिकच्या बाटलीत दिले जात नाही. यासाठी पंपावर केवळ मान्यताप्राप्त स्टील किंवा जाड मेटलचे कंटेनर वापरणे बंधनकारक असते.

6 / 8
तसेच, जर तुम्हाला जनरेटर, शेतीची कामे किंवा इतर कारणांसाठी २० ते २०० लीटरपर्यंत इंधन ड्रममध्ये हवे असेल, तर तुम्हाला ते कोणत्या कारणासाठी हवे आहे याचे लेखी कारण म्हणजेच डिक्लेरेशन पंपावर लिहून द्यावे लागते.

7 / 8
या उलट, जर कोणाला एका वेळी २०० लीटरपेक्षा जास्त इंधन खरेदी करायचे असेल, तर त्यासाठी पेट्रोलियम अँड एक्स्प्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन म्हणजेच 'पेसो'चा अधिकृत साठवणूक परवाना असणे अनिवार्य आहे. या परवान्याशिवाय पंपाने मोठ्या प्रमाणात इंधन दिल्यास त्यांचा परवाना रद्द होऊ शकतो.

8 / 8
सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, देशामध्ये सध्या पुरेसा इंधनाचा साठा सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडून घाबरून जाण्याची गरज नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिकृत परवान्याशिवाय घरात किंवा गोदामात ज्वलनशील पेट्रोल-डिझेलचा मोठा साठा करून ठेवणे हा कायदेशीर गुन्हासोबतच अत्यंत मोठा जीवघेणा धोका ठरू शकतो, त्यामुळे नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Follow Us