ड्रायफ्रुट 1, फायदे अनेक ! सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने शरीराला मिळतात जबरदस्त फायदे

खजूर हे आरोग्यासाठी एक वरदान असून ते 'सुपरफूड' म्हणून ओळखले जाते. नैसर्गिक साखर, फायबर आणि खनिजांनी समृद्ध असलेले खजूर शरीराला त्वरित ऊर्जा देतात, पचन सुधारतात आणि हाडे मजबूत करतात. तसेच, ते रक्त वाढण्यास, हृदय व मेंदूचे आरोग्य राखण्यास मदत करतात. वजन वाढवण्यासाठी आणि त्वचा-केसांच्या सौंदर्यासाठीही खजूर अत्यंत फायदेशीर ठरतात.

| Updated on: Sep 02, 2026 | 9:27 PM
1 / 5
ड्रायफ्रुट्स खायला  अनेकांना आवडतं. बरेच लोकं खजूरही आवडीने खात असतील. पण एवढं छोटं दिसणाऱ्या या सुकामेव्यात केवढी ताकद आहे, याची अनेकांना कल्पनाच नसेल.   नियमितपणे खजुराचं सेवन करणं हे आपल्या आरोग्यासाठी वरदानच म्हणावं लागेल. भरपूर पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेला खजूर हा फक्त  शरीराला ऊर्जा देत नाहीत, तर अनेक गंभीर आजारांपासून बचाव करण्यासही मदत करतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, खजूर हे एक सुपरफूड आहे. त्याला पोषक तत्त्वांचा पॉवरहाऊस असंही म्हटलं जातं. मात्र खजूर खाण्याची योग्य पद्धत अवलंबली पाहिजे. तसं सेवन केलं तर खजूर शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवण्यास मदत करू शकतं.

2 / 5

बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण खजुरामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज यांसारख्या नैसर्गिक साखरेचं प्रमाण मुबलक असत. खजूर खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. खजुरामध्ये भरपूर प्रमाणात डायटरी फायबर देखील आढळतात, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्या असेल तर ती दूर होण्यासही मदत होते.

3 / 5

एवढंच नव्हे तर खजुरामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॉपर आणि सेलेनियम यांसारखी खनिजंही मुबलक असतात. त्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते, ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्यांपासून बचाव करण्यास खजूर सहाय्यक ठरू शकतो. खजूर हा लोहाचा (आयर्न) एक चांगला स्रोत आहे. त्याचं नियमित सेवन केलं तर आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास आणि रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत होते.

4 / 5

खजूर हे पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच, खजुराचं सेवन केल्याने मानसिक आरोग्य आणि स्मरणशक्ती सुधारण्यासोबतच डिमेंशियाचा धोका कमी करण्यासही उपयुक्त ठरू शकतं.

5 / 5

याशिवाय, जे लोक दुबळे किंवा बारीक असतात, आणि ज्यांना निरोगी पद्धतीने आपलं वजन वाढवायची इच्छा आहे, त्यांचायासठी देखील खजुराचं सेवन खूप फायदेशीर मानलं जातं. नियमितपणे खजूर खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत होऊ शकते. खजुरामध्ये व्हिटॅमिन सी आणि डी असल्यामुळे त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यास, सुरकुत्या कमी होण्यास आणि केसांना आतून पोषण देण्यास मदत देखील होऊ शकते. (डिस्क्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. ती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us